क्षेत्रभेट की आवश्यकता
Answers
Answer:
क्षेत्रभेटीचे इतर फायदे
- नियोजन कसे करावे हे कळते
- नेतृत्वगुणांचा विकास होतो
- एकमेकांची अधिक चांगली ओळख होते, मैत्री वाढते.
- नवनवीन मित्र मैत्रिणी मिळतात
- जबाबदारपणा येतो
- परिसराशी ओळख होते/ निसर्गाशी नातं/ जवळीक तयार होतं
- दृष्टीकोण विकसित व्हायला मदत होते
Explanation:
क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस्था, मंदीर ई. यांना भेट देणे असा समज होतो. पण हे सर्व तर आपण सहलीतही करतोच. क्षेत्रभेट व सहल यामध्ये खूप सारे फरक करता येतील. जेव्हाही आपण एखादी जागा पहायला (SEE) जातो. त्या भेटीतून आपल्याला कशाची माहिती मिळते हे आपण तिथे जाऊन काय बघतो (LOOK) यावर अवलंबून असते. तर मिळणारे ज्ञान हे आपण तिथे कशाचे निरीक्षण (OBSERVE) करतो यावर अवलंबून असते.
म्हणजेच या तीनही गोष्टी निरनिराळ्या आहेत व त्यांचे फायदे निरनिराळे आहेत.
उदा. समजा आपण ताडोबाचे जंगल पाहायला गेलो आहोत. आता आपण जंगल पाहायला गेलो म्हणजे जंगलात खूप साऱ्या गोष्टी आहेत. झाडे आहेत, इतर प्राणी आहेत, तलाव आहेत पण आपण जर फक्त वाघ शोधत असू तर इतर गोष्टी आपल्याला अगदीच ओझरत्या दिसतील. व वाघदेखील आपण फक्त बघितलेलाच असेल.
पण जेव्हा आपण त्या दिसलेल्या वाघाचा अभ्यास करू, त्यावर विचार करू तेव्हा अगणित गोष्टी शिकायला मिळू शकतील. उदा. वाघ एकटा दिसला म्हणजे वाघ एकत्र राहत नसावेत. मग या वाघाच्या परिसरात दुसरा वाघ आला तर काय होईल हे शोधलं पाहिजे. किंवा हा वाघ लंगडत चालत होता म्हणजे त्याला काही इजा झाली असेल का हे शोधता येईल. ई. ही माहिती आपल्याला खाली दिलेल्या तक्त्यात मांडता येईल.
Answer: