कुंटूबाचे उत्पन्न व खर्च यांचा विचार करून जमाखर्च पत्रक
Answers
मिळकत व खर्च यांत ताळमेळ राहण्याकरिता कुटुंबाने बनविलेले जमा, खर्च व शिल्लक यांचे अंदाजपत्रक. याचे स्वरुप सरकारी किंवा मोठ्या उद्योगधंद्याच्या अंदाजपत्रकासारखेच, पण लहान प्रमाणात असते. एकीकडे वर्षाची अंदाजी प्राप्ती व दुसरीकडे अन्नखर्च, घरभाडे, वीज इ. आवश्यक, ठराविक, नौमित्तिक, सामाजिक व वैयक्तिक खर्च यांचा अंदाज धरून शिल्लक काढली जाते. अर्थात प्रत्यक्ष होणाऱ्या दैनंदिन खर्चाशी वेळोवळी तुलना करून, प्रत्येक बाबीवर होणारा खर्च कमीअधिक करता येतो. हे पत्रक म्हणजे कौटुंबिक पातळीवर योजनापत्रकच होय. त्यायोगे कुटुंबे साधारण कोणकोणत्या बाबींवर किती खर्च करतात, याची माहिती मिळते.
कुटुंबे आपले मासिक उत्पन्न कसे खर्च करतात, ह्यासंबंधी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणासही ‘कौटुंबिक अंदाजपत्रक’ म्हणतात. वस्तुत: ती उपभोगखर्चाची अभ्यासपूर्ण सर्वेक्षणेच असतात. कुटुंबसमूहांकडून अथवा प्रतिनिधिक कुटुंबांकडून माहिती गोळा केली जाते. ही अंदाजपत्रके, कुटुंबे ठराविक काळात विशिष्ट प्रकारच्या वस्तूंवर किती खर्च करतात, हे दाखवितात. निरनिराळ्या उत्पन्न-पातळींवरील विविध व्यावसायिक गटांतील, लहानमोठ्या आकारांच्या आणि विशिष्ट भागांत राहणाऱ्या कुटुंबाकरिता अशी अंदाजपत्रके बनविली जातात. त्यांमध्ये एकूण खर्चाच्या प्रमाणात प्रत्येक बाबीवरील खर्च टक्केवारीने दाखविण्यात येतो.