India Languages, asked by anilrshinde79, 3 months ago

कुटुंबाविषयी चार वाक्य मराठीत​

Answers

Answered by XxitsmrseenuxX
46

Answer:

विश्वातील समस्त जीवांच्या हिताचे पसायदान मागणा-या ज्ञानेश्वरांनी ‘विश्वची माझे घर’ मानून सगळ्या विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली. एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंबेही अस्तित्त्वात आली. मात्र, रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील मानवतेच्या कुटुंबात राहणा-यांची संख्याही कमी नाही. या अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याचीही त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. रक्ताच्या नात्यांमधील कुटुंबाचा विचार करताना अशा कुटुंबांचेही महत्त्व कमी होत नाही. कुटुंबाचे हे विविध पैलू जागतिक कुटुंब दिनानिमित्त मांडले गेले आहेत.

Similar questions