India Languages, asked by msnehal551, 2 months ago

कृती
कोकण सौंदर्यातील लेखकाने टिपलेली सौंदर्यश्यले
सांगा.
उतारा
कोकणातल्या समुद्रकिनार्याजवळ​

Answers

Answered by sshayda1055gmailcom
3

Answer:

कोकणातील समुद्रकिनारे हे तेथे येणाऱ्या पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने नैसर्गिक वरदान असला तरी या किनाऱ्याचे जतन आणि संवर्धन करण्यात गावोगावची माणसे कमी पडताहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात यापैकी अनेक समुद्र किनाऱ्यांची अवस्था ही अत्यंत वाईट झाली आहे. जागोजागी पसरलेल्या प्लास्टिकच्या रंगबेरंगी पिशव्या, दारू-बिअरच्या बाटल्या, कागदाचे तुकडे, निर्माल्य आदी अनेक टाकाऊ वस्तु आणि कचऱ्याचे सर्वत्र ‘साम्राज्य’ आहे. त्याचा भविष्यात पर्यटन व्यवसायावर दुष्परिणाम होणार आहे. मात्र या संकटाला सामोरे जावे लागू नये याकरीता कोकणपट्टीतील जी काही थोडी मंडळी वा संस्था प्रयत्नशील आहेत; त्यात रेवदंडा येथील ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

ज्येष्ठांच्या या संस्थेतर्फे रेवदंड्यात वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यापैकी ‘समुद्र किनाऱ्याची स्वच्छता’ हा एक प्रमुख उपक्रम असून रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थांच्या सहभागाने तो गेली बारा वर्षे सातत्याने राबविला जात आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात, भारताचे माजी कॅबिनेट सेक्रेटरी स्व. भालचंद्र उर्फ बी.जी.देशमुख यांच्या गौरवार्थ इंटरनॅशनल लॉजिव्हीटी सेंटर ऑफ इंडिया या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचाही समावेश आहे. गेल्या डिसेंबरमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते आणि रघुनाथ माशेलकर, शरदचंद्र गोखले, अरुण निगवेकर, डॉ.जयंत उमराणीकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चे अध्यक्ष सुभाष चिटणीस (9421159080) यांनी स्वीकारला.

दूरचित्रवाणीचा प्रसार घरोघरी झाल्यामुळे आता सर्वसामान्य माणसालाही परदेशातील स्वच्छ, सुंदर आणि नितळ समुद्र किनाऱ्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्या तुलनेत आपल्याकडील समुद्र किनारे तेवढेच सुंदर असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत आपण त्यांच्या पासंगालाही नाही, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. आजही अनेक ठिकाणी नैसर्गिकविधीसाठी समुद्रावर जाण्याची प्रथा रुढ आहे. सरकारची हगणदारी मुक्त गावाची योजना त्या ठिकाणी अपयशी ठरली आहे. समुद्र किनारे हे कचरा फेकण्याची जागा झाली आहे. तर अनेक ठिकाणी तेथे अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहे. ही परिस्थिती केवळ कोकण किनाऱ्यावरच आहे असे नाही; ती भारतात सगळ्याच किनारपट्ट्यांवर आहे. पण महाराष्ट्रात किनाऱ्यांची दुर्दशा जास्त लक्षणीय आहे. त्यामुळेच समुद्र किनारे हे कोकणच्या पर्यटन विकासाचा प्राण आहे, याकडे डोळेझाक करून चालणार नाही.

एकीकडे नागरिकांकडून समुद्र किनाऱ्यावर मानवी अतिक्रमणे होत असतानाच गेल्या काही वर्षात समुद्रामध्ये जहाजे बुडून तेल गळतीच्या घटना घडून सागर संपत्ती आणि तटवर्ती भूप्रदेशाचा पर्यावरणीय ऱ्हास होत आहे. दोन वर्षापूर्वी मुंबईनजिक एम.व्ही.खलिजा आणि एम.एस.सी.चित्रा ही दोन जहाजे परस्परांवर आदळून झालेल्या तेल गळतीमुळे मुंबई व रायगड जिल्ह्यात कांदळवनाची, सागरी किनाऱ्याची आणि जीवसृष्टीची अपरिमित हानी झाली. त्यानंतर गेल्या वर्षी ४ ऑगस्ट २०११ रोजी एम.व्ही.रॅक कॅरीअर बुडाल्यामुळे तसेच विस्डम आणि त्यानंतर पॅव्हीट ही दोन जहाजे समुद्रात भरकटत आल्यामुळे झालेली तेल गळती समुद्र किनाऱ्यांचे नुकसान ��रून गेली. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी अशा वारंवार घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण, प्रतिबंध व कडक उपाययोजना अंमलात आणल्या नाहीत तर एक दिवस कोकणच्या किनारपट्टीचे सौंदर्यच नष्ट होऊन गेल्याचे हताशपणे पहावे लागेल.

ठाणे जिल्ह्यातील केळवा-माहिम, बोर्डी, डहाणू, अर्नाळा, रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन, श्रीहरीहरेश्वर, अलिबाग, मुरूड-जंजिरा, काशीद, मांडवा, सासवणे, आवास, वरसोली, किहीम, रेवदंडा, अक्षी, नागाव, साळाव, बागमांडला, आगरदांडा, कोर्लई, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, हर्णे, मुरूड, लाटघर, बुरोंडी, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मालवण, निवती, भोगवे, वेंगुर्ले असे अनेक ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी मौजेची स्थळे आहे. पर्यटक प्रामुख्याने या जागी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात. मात्र त्यातील काहींच्या अनिर्बंध व बेशिस्त वागण्यामुळे आज कोकणचा समृद्ध, निसर्गसुंदर किनारा घुसमटून गेला आहे. या समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारला तर ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो. ही परिस्थिती बदलावयाची असेल तर येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न करावे लागतील. भविष्यात किनारे जपण्यासाठी, त्यांचे सौंदर्य टिकविण्यासाठी योग्य पर्याय निवडले नाहीत, तर पुढच्या पिढ्यांसाठी कोकणातील सुंदर पर्यटनस्थळे बघण्यालायकच राहणार नाहीत!

या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीच्या लायन्स क्‍लबने गेल्या सोमवारी, २४ सप्टेंबर रोजी शहरातील मांडवी किनारी राबविलेल्या एका स्तुत्य उपक्रमाची नोंद घ्यावी लागेल. सध्या कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गौरी आणि पाच दिवसाच्या गणपतींचे विसर्जन रविवारी झाले. गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्तीबरोबर निर्माल्यही समुद्रात वाहण्याची परंपरा आहे. ते निर्माल्य लाटांबरोबर किनाऱ्यावर येऊन जमा होते. त्यात प्रामुख्याने पुजेसाठी वाहिलेली फुले, केळीची पाने, सजावट साहित्याचा समावेश असतो. किनाऱ्यावर येणाऱ्या लोकांचे पाय या निर्माल्यावर पडतात. त्यामुळे त्याच्या पावित्र्याला धक्का पोहोचतो. त्याशिवाय किनाऱ्यावर अस्वच्छता निर्माण होते आणि तेथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.

Answered by sahilnikode37
1

Answer:

तापीकाठची चिकणमाती ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. अस जात चांगल तर सोजी तरी दळू ग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई असा रथ चांगला तर नंदी तर जुपिन ग बाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगले तर धिगामस्ती करू ग बाई.

Similar questions