कृती क्र. ७) निबंध लेखन (कल्पना विस्तार)
खालील सूचनेनुसार कृती करा.
मी चित्रकार झालो तर ' या विषयावर काल्पनाप्रधान निबंध लिहा
Answers
Answer:
Follow the instructions below.
If I became a painter, write a fictional essay on the subject in marathi
Step-by-step explanation:
Answer:
मी चित्रकार झालो तर माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होईल, कारण मला चित्र काढायला फार आवडते व त्यातले रंग ते तर त्याहून जास्त आवडतात.
चित्र काढणे ही सुद्धा एक कलाच आहे. आपल्या मनातील चित्र प्रत्यक्षात कागदावर उतरवणे व त्यात रंगीबेरंगी रंग भरणे यात वेगळीच मजा आहे. निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचे आपण निरीक्षण करतो पण ते प्रत्यक्षात उतरवणे यात वेगळाच आनंद आहे. मी चित्रकार झालो तर माझ्या मनात मी रंगवलेल्या व काढलेल्या प्रत्येक चित्राला प्रत्यक्षात कागदावर उतरवायला मला खूप आवडेल.
चित्रातील रंगीबेरंगी रंग बघून डोळ्यांना खूप सुख मिळते असे वाटते. त्या चित्राकडे बघतच राहावे. मी माझ्या मनामध्ये खूप चित्रांची साठवण करून ठेवली आहे आणि खूप चित्र काढली आहेत. चित्र काढताना मी त्या चित्रांमध्ये इतका मग्न होतो की मला कशाचेच भान राहत नाही मला माझे स्वप्न पूर्ण करून लोकांचे कौतुकाची दोन शब्द ऐकायला फार आवडेल. माझ्या चित्रांची कुणी प्रशंसा केलेली मला आवडेल. मी मुलांना चित्र काढण्यासाठी मार्गदर्शन करेल व प्रत्येक चित्र काढताना कसे काढावे, त्यात कुठले रंग भरावे हे शिकवणार.
मी काढलेल्या प्रत्येक चित्रांमधून लोकांना मी एक संदेश देणार, काही चित्रांमधून समाजातील वाईट प्रथा परंपरा यांची जनजागृती करणार. मला माझी ओळख चित्रकार म्हणून द्यायला फार आवडेल.