कृती ३: काव्यसौंदर्य कृती (१) 'दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली। पाहातसे वाटुली पंढरीची।।' या पक्तींतील आशय स्पष्ट करा.
Answers
Answer:
कृती ३: काव्यसौंदर्य कृती (१) 'दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली। पाहातसे वाटुली पंढरीची।।' या पक्तींतील आशय स्पष्ट करा
Answer:
दिवाळीच्या मुळा लेंकी असावली।
पाहातसे वाटूली पंढरीची।
वरील ओळी या तुकाराम महाराजांच्या 'भेटी लागे जीवा' या संतवाणीतील आहेत.
तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी मुलगी सासरी जाते आणि बराच वेळ तिथे राहिल्यानंतर तिला आपल्या माहेरच्या माणसांची आठवण येते. माहेरच्या माणसांची आठवण झाल्यामुळे आपण माहेरला कधी जाऊ याची तिला हुरहुर लागते. आणि म्हणूनच ती सासरी गेलेली मुलगी दिवाळीसारख्या सणाची वाट पाहत असते कारण दिवाळीच्या निमित्ताने माहेरहून कोणीतरी येईल आणि तिला पुन्हा माहेरी घेऊन जाईल. ती आपल्या माहेरच्या लोकांची आतुरतेने वाट पाहत असते. तुकाराम महाराज म्हणतात त्या सासरी गेलेल्या मुली प्रमाणेच हे परमेश्वरा मी देखील तू मला आणण्यासाठी कोणालातरी पाठवशील याचीच वाट पाहत आहे. कारण मी देखील तुला भेटण्यासाठी खूप आतुर झालो आहे. माझी अवस्था त्या सासरी गेलेल्या मुली सारखी झाली आहे. म्हणून ये विठ्ठला लवकरच कुणाला तरी पाठव आणि माझ्या आयुष्याचे सार्थक कर.
Explanation: