India Languages, asked by sakshi972357, 1 month ago

किती मोठी आहे तुझी शाळा! covert into vidhanarathi vakya​

Answers

Answered by svmnazirkar12345
4

Explanation:

वाक्यरूपांतराला ‘वाक्यपरिवर्तन’ असेही म्हणतात. आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्ये बोललाे तर ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात. शिवाय त्यातून योग्य भाव पोहोचेलच असे वाटत नाही. तद्वतच लेखकाने एकाच साच्याची वाक्ये लिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला कंटाळा येतो. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा डौल, भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल, तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण वाक्यांतून आपली भाषा

डौलदार व परिणामकारक होईल असा प्रयत्न करावा. वाक्यरूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठी वाक्यरूपांतर करायला शिकणे साहाय्यभूत ठरते.

वाक्यरूपांतर म्हणजे वाक्यरचनेत करावा लागणारा बदल होय. हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी; ती म्हणजे, वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला, तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. वाक्यार्थाला बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे ‘वाक्यरूपांतर’ होय.

उदा., लोकांचे दारिद्र्य पाहून मला दु:ख होते. (विधानार्थी-होकारार्थी)

लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. (विधानार्थी-नकारार्थी)

प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर केलेले आहे. आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे वाक्यरूपांतर शिकायचे आहे.

(अ) प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

(१) जगात सर्व सुखी असा कोण आहे? (प्रश्नार्थी)

जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (विधानार्थी)

(२) अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? (प्रश्नार्थी)

अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. (विधानार्थी)

वरील उदाहरणांत जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्यांचे उत्तर दडलेले असते. अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना लक्षात ठेवावे,की

(१) प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे.

(२) प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे.

(अा) उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

(१) बापरे! केवढी उंच आहे ही इमारत! (उद्गारार्थी )

ही इमारत खूपच उंच आहे. (विधानार्थी)

(२) काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. (विधानार्थी)

किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री! (उद्गारार्थी)

उद्गारार्थी वाक्ये अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिमाण, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते. विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते स्पष्ट करावे. त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यांसारखे शब्द वापरले जातात.

(इ) आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

उदा., (१) तू नियमित व्यायाम कर. (आज्ञार्थी)

तू नियमित व्यायाम करावास. (विधानार्थी)

(२) ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. (विधानार्थी)

ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. (आज्ञार्थी)

आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. या वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा.

(ई) होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर

(१) त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (होकारार्थी)

त्याच्यासाठी हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही. (नकारार्थी)

(२) ही काही वाईट कल्पना नाही. (नकारार्थी)

ही कल्पना चांगली आहे. (होकारार्थी)

वरील उदाहरणांमध्ये ‘मोठी’ विरुद्ध ‘लहान’ आणि ‘वाईट’ विरुद्ध ‘चांगली’ असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही.

कृति

(२) कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

(१) सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)

(२) तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)

(३) किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)

(४) पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)

(५) चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)

(६) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)

(७) अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)

(८) तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)

(९) निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)

(१०) दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)

(१) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)

(२) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)

(३) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा

(१) एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये?

(२) ‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की!

(३) आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं.

Similar questions