India Languages, asked by marutidesai, 8 months ago

कुत्र्याची शेपटी वाकडी का असते? ​

Answers

Answered by halfsisters83
5

Answer:

कुत्र्याची शेपटी ही नेहमीच वाकडीच का असते? याचे उत्तर अजूनही कोणाकडे नाही. मात्र, कुत्र्याच्या वाकड्या शेपटावरून अनेक वाकड्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आणि प्रतिमा सहज आणि सोप्या पद्धतीने लोकांसमोर उभ्या करायला मदत होते. सरळ मन आणि वाकडी शेपटी असलेल्या माणसांच्या या ख-या मित्राची त्यासाठी मन:पूर्वक माफी मागायला हवी. पाकिस्तानचीही प्रतिमा अशीही कुत्र्याच्या वाकडय़ा शेपटासारखी आहे. भारताला हे चांगले माहीत आहे. मात्र, आता ही प्रतिमा जगभर होत चालली आहे. भारताच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेत घुसून भारतीय जवानांच्या केलेल्या शिरच्छेदाचा निषेध संरक्षणमंत्री, तिन्ही सेना दलाचे प्रमुख, पंतप्रधान यांच्यासह सर्वच भारतीयांनी केला आहे. भारताने पाकिस्तानला धारेवर धरलेले आहेच. पण त्याचबरोबर सज्जड दमही दिला आहे. मात्र, असे असतानाही पाकिस्तानने सुरुवातीपासून असे घडले नाही, आम्ही असे केले नाहीच, असा कांगावा नेहमीप्रमाणे सुरू ठेवला. भारतीय जवानच नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात आले आणि त्यांनी हल्ला केला, असे त्यांनी म्हटले आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी हा दावा फेटाळला आहे. भारतीय जवानाचे शीर कापून पाकिस्तानी जवानांनी ते पाकिस्तानात नेले, तेव्हा ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी त्यांचे चक्क अभिनंदन केले आणि ते सा-या जगाने पाहिलेले आहे. भारत आक्रमक असेल आणि पाकिस्तान फक्त स्वत:चे संरक्षण करण्यासाठी गोळीबार करत असेल तर भारतीय जवानांनी हल्ला केला, अशी सर्वप्रथम त्यांनी तक्रार जगासमोर मांडायला हवी होती. आता सगळ्या जगामध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यातून पाकिस्तान हे बेजबाबदार राष्ट्र आहे, असा बभ्रा सगळीकडे व्हायला लागला तेव्हाच पाकिस्तानची प्रतिक्रिया आलेली आहे. याचा अर्थ पाकिस्तानची ही पश्चातबुद्धी आहे. म्हणजे आधी हल्ला करायचा आणि नंतर आरोप केल्यास उलटा आरोप भारतावरच करायचा ही त्यांची प्रतिक्रिया आहे आणि त्या प्रतिक्रियेतच त्यांचा खोटेपणा लपलेला आहे. असे घडण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. शस्त्रसंधी मोडण्याचा पाकिस्तानने जागतिक विक्रमच केला आहे. प्रकरण जास्तच अंगाशी येतेय, असे वाटल्यामुळे भारतच चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार म्हणायला लागल्या आहेत. त्यामागेही काही कारणे असू शकतात. पाकिस्तानमध्ये मे महिन्यापर्यंत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र, आताच पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशा परिस्थितीत सत्तारूढ पक्षातील सर्वच नेते पाकिस्तानी नागरिकांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. खार यांच्या विधानावरून त्यांनीही इतर नेत्यांप्रमाणे त्यात आघाडी घेतल्याचे दिसते. पण शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच.

HOPE IT HELPS!!!!

PLS MARK AS BRAINLIEST!!!!

Similar questions