India Languages, asked by vishalchavan2312, 2 months ago



कृती ४ सूत्रसंचालन म्हणजे काय ते सांगून, सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आपल्या शब्दात लिहा.​

Answers

Answered by rajraaz85
7

Answer:

सूत्रसंचालन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवेदन करून त्या कार्यक्रमाला व्यवस्थितरित्या पुढे नेणे होय.

कुठल्याही कार्यक्रमाच्या यशासाठी त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे फार महत्त्वाचे असते. जर सूत्रसंचालनच चांगले नसेल, तर प्रेक्षकांना कार्यक्रमात आनंद मिळत नाही.

सूत्रसंचालन म्हणजे फक्त कार्यक्रमाला पुढे नेणे नव्हे, तर कार्यक्रम आणि प्रेक्षक यांचा मेळ घडवून आणणे होय.

सूत्रसंचालन करताना काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्या खालील प्रमाणे:

१. सूत्रसंचालन करताना प्रेक्षक कंटाळणार नाही,त्यासाठी पाल्हाळ लावणे थांबवले पाहिजे.

२. केलेले नियोजनापेक्षा शेवटच्या क्षणाला अनावश्यक गोष्ट मध्येच घेणे टाळले पाहिजे.

३. कार्यक्रम भरकटेल अशा गोष्टी टाळल्या पाहिजे.

४. कार्यक्रमाचे असलेली वेळ जास्त वाढणार नाही यासाठी अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजे.

५. सूत्रसंचालन करताना कुठल्याही प्रकारचे गुंतागुंतीचे वाक्य ज्यातून भ्रम निर्माण होण्याची शक्यता असेल असे वाक्य व शब्द टाळले पाहिजे.

६. सूत्रसंचालन करताना लोकांचे मनोरंजन होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अनावश्यक व संदर्भ रहित कवितेच्या ओळी, एखादी लहानशी कथा, किंवा शायरी टाळली पाहिजे.

७. अचानक एखाद्या पाहुण्याला किंवा व्यक्तीला नियोजन नसेल तर भाषण देण्यास सांगण्याचे टाळले पाहिजे.

८. सूत्रसंचालन करताना भाषेचे खूप महत्त्व असतं म्हणून कुठल्याही प्रकारचा कार्यक्रमाला गालबोट लागेल अशा भाषेचा वापर टाळावा.

९. लोकांना उपदेश देण्याचे टाळावे.

Answered by shailendrabanode11
0

Answer:

Here is your answer

Plz.. Mark me as a brain list .....

Attachments:
Similar questions