Hindi, asked by sanuuusanuuu52, 18 days ago

कृती ३ : (स्वमत अभिव्यक्ती) (१) भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा.

Answers

Answered by sakshi7112
3

Explanation:

भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर:

मानवाच्या तीन मुलभूत गरजा – अन्न, वस्त्र, निवारा. या पाठातील भिक्षेकऱ्याकडे या तिन्ही गोष्टी नाहीत, निवारा म्हणजे राहायला घर नाही म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील एक नाही तर दोन शाली दिल्या. पण दोन दिवसापासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. माणूस श्रीमंत असो की गरीब त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल; पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे आणि त्यामुळे भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली हे माझ्या मते योग्यच आहे.

Similar questions