(क) तत्त्वज्ञानाचा मूलभूत विषय कोणता?
Answers
Explanation:
भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरूवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे.
तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व,ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा इतर ज्ञानशाखा आहेत; त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते.
प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सक चर्चा करणे, विवेकशील युक्तिवाद करणे आणि सुव्यवस्थित सादरीकरण करणे ही सर्वसाधारण तात्त्विक पद्धती मानली जाते. "काहीतरी जाणणे शक्य आहे का? ते सिद्ध करणे शक्य आहे का? वास्तव म्हणजे काय? नीती म्हणजे काय? किंवा "जीवन जगण्याची उत्तम रीती कोणती ? " असे प्रश्न तात्त्विक समजले जातात.
भारतीय आणि पाश्चात्य अर्थाने पाहता, मानव स्वतःच्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी असल्याने त्याच्या या आत्मजाणीव असणाऱ्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते.
Answer:
vidnyan science tantradnyan