India Languages, asked by shaikhtalib37, 2 months ago

केंद्र, जमीन, फळ, कार्यक्रम या शब्दांचे लिंग ओळखा. *

१) नपुसकलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग, स्त्रीलिंग

२) स्त्रीलिंग, स्त्रीलिंग, पुलिंग, नपुसकलिंग

३) नपुसकलिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, पुल्लिंग​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

केंद्र- नपुसकलिंग

जमीन -स्त्रीलिंग

फळ -नपुंसकलिंग

कार्यक्रम- पुल्लिंग

म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे.

नपुसकलिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, पुल्लिंग.

Explanation:

मराठी भाषेत कुठल्याही नामाची विभागणी ही तीन लिंगात केली जाते. जसे नपुसकलिंग, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग.

वाक्यात येणारे नाम स्त्रीलिंग, पुलिंग, का नपुसकलिंग आहे हे त्याच्या साठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामावर ठरते.

जर 'ती' हे सर्वनाम वापरले तर ते नाम स्त्रीलिंगी असते.

उदाहरणार्थ -ती जमीन, ती गाय

जर 'तो' हे सर्वनाम वापरले तर ते नाम पुल्लिंगी असते.

उदाहरणार्थ- तो वाडा, तो दगड

आणि जर 'ते' हे सर्वनाम वापरले तर ते नाम नपुसकलिंगी असते.

उदाहरणार्थ- ते पुस्तक, ते रान

Answered by uumanatha9
0

Answer:

केंद्र - नपुसकलिंग

जमीन - स्त्रीलिंग

फड - नपुसकलिंग

कार्यक्रम - पुल्लिंग

Similar questions