Political Science, asked by poonamdongale29, 9 months ago

कोविड १९ म्हणजे काय? तो कशामुळे होतो

Answers

Answered by dnyanudhande
1

Answer:

कोरोना व्हायरस म्हणजे विषाणूंमधील अशी एक मोठी जात ज्यामुळे मानव किंवा प्राणी आजारी पडतात. मानवाला या विषाणूचा संसर्ग झाल्यास सर्दीपासून ते श्वसन यंत्रणेत संसर्ग होण्याचा धोका असतो. कोरोना व्हायरसमुळे COVID -19 हा आजार होतो हे नुकतंच सिद्ध झाले आहे.

COVID-19 हा एक संसर्गजन्य आजार आहे जो नुकत्याच शोध लागलेल्या कोरोना व्हायरसमुळे होतो. चीनमधील वुहानमध्ये गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा या विषाणूचा आणि आजाराचा प्रादुर्भाव झाला. तोपर्यंत जगाला या विषाणूची आणि आजाराची माहिती नव्हती.

ज्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे त्याच्यापासून इतरांना COVID-19 होऊ शकतो. COVID-19ची लागण झालेली व्यक्ती जेव्हा खोकते किंवा शिंकते तेव्हा त्या व्यक्तीच्या नाक किंवा तोंडातून उडालेल्या थेंबांमुळे इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हे थेंब आजूबाजूच्या वस्तू किंवा पृष्ठभागांवर पडतात. त्यानंतर इतर व्यक्तींचा या वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श झाला आणि त्यांनी आपल्या त्याच हातांनी तोंड, डोळे किंवा नाकाला स्पर्श केला तर COVID-19ची लागण होते. याशिवाय जेव्हा COVID-19ची लागण झालेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा ते थेंब श्वसनामार्गे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्या व्यक्तीलाही COVID-19ची लागण होऊ शकते. त्यामुळे अशा आजारी व्यक्तीपासून १ मीटर(3 फूट) लांब राहावे.

Explanation:

i hope this will be help you.....

Similar questions