India Languages, asked by omkasbe2042003, 11 months ago

कोवीडनंतरची भारता
समोरील आव्हान​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

\huge\bold\red{ANSWER :-}

  • ==>> तीन महिन्यांपूर्वी चीनमध्ये उगम पावलेले करोना विषाणूचे संकट क्रमाक्रमाने व वादळी वेगाने एकएक देश पादाक्रांत करत सुटले आणि आता संपूर्ण जग त्याच्या विळख्यात सापडले आहे. हा अंक प्रसिद्धीला जात असताना (२८ मार्च) आलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झालेली असून, २८ हजारांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. ही लागण व हे मृत्यु आधी बेरजेच्या पद्धतीने, नंतर गुणाकाराच्या पद्धतीने वाढत गेले आहेत. आणि यापुढे ही वाढ भूमितीच्या पद्धतीने होणार आहे, अशी भीती जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. परिणामी संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. आधी मास्क वापरण्याच्या सूचना, नंतर रस्त्यावर कमीत कमी येण्याच्या सूचना, त्यानंतर लोकांनी समूहामध्ये न वावरण्याच्या सूचना आणि अखेरीस घराबाहेर न पडण्याच्या सूचना, हे सारे अतिशय वेगाने घडत आले आहे. आणि मग २५ मार्च ते १४ एप्रिल असे पूर्ण २१ दिवस संपूर्ण भारत देश ‘लॉकडाऊन’ची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे अहोरात्र काम करत आहेत.
Answered by Anonymous
4

Answer:

==>> तीन महिन्यांपूर्वी चीनमध्ये उगम पावलेले करोना विषाणूचे संकट क्रमाक्रमाने व वादळी वेगाने एकएक देश पादाक्रांत करत सुटले आणि आता संपूर्ण जग त्याच्या विळख्यात सापडले आहे. हा अंक प्रसिद्धीला जात असताना (२८ मार्च) आलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झालेली असून, २८ हजारांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. ही लागण व हे मृत्यु आधी बेरजेच्या पद्धतीने, नंतर गुणाकाराच्या पद्धतीने वाढत गेले आहेत. आणि यापुढे ही वाढ भूमितीच्या पद्धतीने होणार आहे, अशी भीती जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. परिणामी संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. आधी मास्क वापरण्याच्या सूचना, नंतर रस्त्यावर कमीत कमी येण्याच्या सूचना, त्यानंतर लोकांनी समूहामध्ये न वावरण्याच्या सूचना आणि अखेरीस घराबाहेर न पडण्याच्या सूचना, हे सारे अतिशय वेगाने घडत आले आहे. आणि मग २५ मार्च ते १४ एप्रिल असे पूर्ण २१ दिवस संपूर्ण भारत देश ‘लॉकडाऊन’ची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे अहोरात्र काम करत आहेत.

Similar questions