Social Sciences, asked by sakshisatkar31, 1 month ago

काव्यसौंदर्य.
(अ) 'काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते' या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
आ) 'नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते' या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
ग्रहण.
लील ओळींचे रसग्रहण करा.​

Answers

Answered by ROYALMARATHA19
8

Answer:

(अ) .रोज मातीत' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्त शब्दांत व्यक्त केले आहे.

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे. शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री 'आई' असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची 'काळी आई' आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे. स्त्रीसुलभ नितळ, प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे. शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळींतून समर्पकरीत्या प्रकट झाला आहे.

(आ) .कवयित्री कल्पना दुधाळ यांनी 'रोज मातीत' या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.

शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.

शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना 'मन दाबणे' हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.

Answered by tusharsarap5
0

Answer:

अ) 'रोज मातीत' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी

दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्त शब्दांत व्यक्त केले आहे.

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे... शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री 'आई' असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची 'काळी आई' आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

पिकाने फुलून 'आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे. स्त्रीसुलभ नितळ, प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे. शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळींतून समर्पकरीत्या प्रकट झाला आहे.

आ). कवयित्री कल्पना दुधाळ यांनी 'रोज मातीत' या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.

शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वतःचे मन त्यात दाबते. स्वतःला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.

शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना 'मन दाबणे' हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.

Similar questions