काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
'सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं ।।
भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।'
Answers
Explanation:
प्रस्तावना :
प्रस्तुत अभंग संत नामदेव यांच्या द्वारे लिखित आहे. संत नामदेव महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील मराठी संतां पैकी एक होते. त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठला प्रती असलेली भक्ती दिसून येते.
'अंकिला मी दास तुझा' ही अभंग वाणी (सकल संत गाथा) नामदेव महाराजांचे अभंग गाथा (अभंग क्रमांक 1661) यामधील आहे. यामध्ये संत नामदेव महाराज विठ्ठलास आपली माता मानतात.
विठ्ठलास माऊली मानून आई ज्याप्रमाणे आपल्या बाळावर जसे प्रेम करते त्याप्रमाणे विठ्ठलाने ही आपल्या भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करावा अशी विनवणी नामदेव विठ्ठलास करतात.
॥ सवेंचि झेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥
॥ भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥
प्रस्तुत अभंगांमध्ये विठ्ठलास माऊली समजून नामदेवाने विठ्ठलाची विनवणी केली आहे की ज्याप्रमाणे झाडावरून पिल्ले जमिनी वर पडताच अगदी तात्काळतेने पक्षिनी जमिनीकडे झेप घेते आणि आपल्या पिल्लांना वाचविण्याचा प्रयत्न करते. आणि वासरास भूक लागल्यास गाय त्याला पान्हा पाजण्यासाठी गाय हंबरत धावत वासराकडे जाते अगदी त्याप्रमाणेच विठ्ठल माऊली, तु पण मी हाक दिल्यास धावत ये.
प्रस्तुत ओळीं द्वारे नामदेवांची विठ्ठलां प्रति असलेली भक्ती दिसून येते.
Answer:
सवेचि झेपावें पक्षिणी । पिली पडताचि धरणीं । भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धावे ।