India Languages, asked by nirmalshrestha6340, 1 year ago

(४) काव्यसौंदर्य
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’
(अा) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
(इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

Answers

Answered by Mandar17
97

"नमस्कार मित्रा-

हे तिन्ही प्रश्न कुमारभारती(१० वी) च्या उत्तमलक्षण या संतकाव्यातील आहेत. या काव्यात रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत.


(अ) या ओवीत संत रामदास महाराज सांगतात की - 'लोकांचे मन तोडू नये, त्यांच्या भावनांचा आदर करावा. वाईट मार्गाने संपत्ती मिळवू नये. नेहमी पुण्यामार्गाचा अवलंब करावा. कुणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये.'


(आ) या ओवीत संत रामदास म्हणतात - 'सभेमध्ये असताना आपले मत मांडण्यास घाबरू नये. आपले विचार स्पष्टपणे पण कुणालाही वाईट वाटणार नाही अशे मांडावे. लहान मुलासारखे असंबद्ध बोलू नये'


(इ) या पंक्तीत रामदास महाराज आळस हा चुकीचा आहे हे सांगताना बोलतात - 'आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे माणूस निष्क्रिय बनतो. म्हणून आळसाला आराम मानू नये.'


धन्यवाद..."

Answered by ksk6100
51

(४) काव्यसौंदर्य  

खालील काव्यसौंदर्यसाठी  दिलेल्या ओवी ह्या संत रामदासांच्या "उत्तमलक्षण" या 'श्रीदासबोधातील' काव्य संग्रहातील आहेत.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.

‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’

उत्तर :-  वरील ओवी ह्या संत रामदासांच्या "उत्तमलक्षण" या 'श्रीदासबोधातील' काव्य संग्रहातील आहेत,उत्तम पुरुषाची लक्षणे सांगताना संत रामदास म्हणतात कि, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी त्यांच्या विनंतीचा अनादर करू नये. पाप करून मिळवलेल्या संपत्तीचा कधीही साठा करू नये, पुण्याचा मार्ग कधीही सोडू नये.पुण्य हे नेहमी कामातच पडते .  

(अा) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर :- वरील ओवी ह्या संत रामदासांच्या "उत्तमलक्षण" या 'श्रीदासबोधातील' काव्य संग्रहातील आहेत, ते उत्तम व  गुणवान व्यक्तींचे लक्षणे सांगताना  म्हणतात, सामूहिक सभेमध्ये लाजू नये, मोकळ्या मानाने आपले विचार मांडावेत परंतु बाष्फळ बडबड म्हणजेच बालिशपणे बोलू नये.  

(इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर:-  वरील ओवी ह्या संत रामदासांच्या "उत्तमलक्षण" या 'श्रीदासबोधातील' काव्य संग्रहातील आहेत, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना व्यक्तीने जीवनात काय करू नये हे संत रामदास सांगतात , ते म्हणतात की , काम ना करता आळस करून आनंद घेऊ नये आळसात कधीही सुख नसते,नेहमी कष्ट कार्व्येत व चांगल्या कामातून आनंद घ्यावा .

Similar questions