) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
(१) 'कांग वाकुडेपणा हा,
कांग अशी पाठमोरी?
ये गये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी'
Answers
Answered by
5
Explanation:
'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्रीने प्राणसई घनावळ
मैत्रिणीच्या नात्याने बरसण्याची विनवणी केली आहे.
कडक उन्हाळ्याचा दाह सगळे शेतकरी सहन करत
आहत. पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत.
उन्हाच्या झळा लागून बाळाचे चेहरे कोमेजले आहेत.
घरातील मंडळींची मने उदास झाली आहेत. शत
उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले
आहेत. अशा अवर्षणाच्या वेळी कवयित्री पावसाळी
ढगांची विनवणी करताना म्हणते की, हे प्राणप्रिय
सखी, तू अशी विपरीत का वागत आहेस?
आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस?
वाऱ्यावरून झेप घेत तू लगबगीने खाली ये आणि
थेंबांची बरसात कर. भावपूर्ण शब्दांत काळजाची
व्यथा या ओळींमधून प्रकर्षाने व प्रत्ययकारी रितीने
व्यक्त झाली आहे.
Similar questions