काव्यसौंदर्य .
(अ) तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.
(आ) ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
(इ) सामाजिक बदलाबाबत कवि तेतून व्यक्त झालेला वि चार स्पष्ट करा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "मी वाचवतोय" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी सतीश काळसेकर आहेत. आधुनिक बदलाची खंत या कवितेत कवींनी केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे.
★ काव्यसौंदर्य.
(अ) आपणास जाणवलेली कवीच्या मनातील खंत.
उत्तर- आधुनिक बदलामुळे समाज बदलत चालला आहे. जुन्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत याची खंत कवीला वाटते. आपल्या भूमीची संस्कृती कुणीही जपत नाही. यामुळे आपले सांस्कृतिक वैभव नष्ट होते की काय अशी खंत कवीला वाटत आहे.
(आ) ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य.
उत्तर- पूर्वीच्या कवितांमध्ये सांस्कृतिक मूल्ये अविनाशी होती. त्यात एक भावार्थ दडलेला होता. मात्र या आधुनिक कवितेमध्ये हा भावार्थ विरत चालला आहे. त्यात लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता कवीला या ओळीतून सांगायची आहे.
(इ) सामाजिक बदलाबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार.
उत्तर- पूर्वीच्या काळी नैतिक व सामाजिक मूल्ये जपली जायची. मात्र नंतर शहरे वाढू लागली व आधुनिकतेमुळे हि मूल्ये नष्ट होऊ लागली. आधुनिक समाजव्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे.
धन्यवाद...
Explanation:
काव्य प्रतिभा वाटने मनजे काय