काव्यसौंदर्य.
(१) ‘बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून’, या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
(२) ‘डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत’, या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "वनवासी" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत. वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यांतील जीवन, निसर्ग, निसर्गविषयीचे प्रेम त्यातील अतूट नाते यांचे वर्णन या कवितेतून कवीने केले आहे. 'वळीव' या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता घेतली आहे.
★ काव्यसौंदर्य.
(१) ‘बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून’,
उत्तर- या वनवास्यांचे जीवन निसर्गसहवासात असल्याने त्यांना निसर्गाविषयी प्रेम वाटते. त्यांना सूर्य, चंद्र आपले मित्र वाटतात. आम्ही सूर्यावर रुसून बसू चंद्राला बघून हसू निसर्गावरील निर्व्याज प्रेम वनवासिंच्या तोंडून व्यक्त केले आहे.
(२) ‘डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत’, या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ.
उत्तर- निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या या आदिवास्यांना हे जीवन मुक्तपणे उपभोगायला आवडते. त्यांना जीवनाविषयी मोठ्या आशा असतात. उघड्या रानात मोकळ्या सहवासात वावरताना डोक्यावरील आभाळ पेलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. वाऱ्याच्या बरोबरीने आम्ही पळू. जंगलाचा राजा सिंहासारखे दमदार भारदस्त अशी आमची चाल आहे.
धन्यवाद...