३) काव्यसौंदर्य खालील काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा. 'स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया'
Answers
Answer:
वरील काव्यपंक्ती अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया या कवितेतील आहेत.
Explanation:
कवी अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राबद्दल असलेले प्रेम आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे. महाराष्ट्र भूमी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे व त्यासाठी आपण काय काय केले पाहिजे याविषयी बोलताना ते अनेक उदाहरणे देतात. ते म्हणतात ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे, तसेच इथे अनेक योद्धे जन्माला आले व या भूमीला पावन केले.
वरील काव्यपंक्ती च्या माध्यमातून असेच महाराष्ट्राचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज व त्यांनी केलेले महान असे कार्य ते आठवतात. ते म्हणतात शिवरायांनी आपले पूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी व मराठी अस्मितेसाठी खर्च केले. स्वतःचा चैनीचा विचार न करता फक्त मराठी माणसाच्या अस्मितेसाठी व त्यांना मानाने जगता यावे यासाठी शिवरायांनी आपल्या आयुष्य पणाला लावले.
कवी म्हणतात, या मातृभूमी ने आपल्याला भरपूर दिले आहे त्याचे पांग फेडण्यासाठी आपण स्वतःचा देह जरी दिला तरी तो कमी पडेल .स्वतःच्या जगण्याची परवा न करता या मातृभूमीसाठी आपला देह नेहमी तयार ठेवला पाहिजे कारण मातृभूमीच सर्वकाही असते.