कावळा, पिशवी, चप्पल, गुलाब गोष्ट लेखन
Answers
Answer:
गुलाब हे निसर्गाची सर्वात सुंदर देन असून फुलांमध्ये या पिकाचे स्थान सर्वात वरचे असल्यामुळे गुलाबाच्या फुलाला ‘फुलांची राजा’ असे संबोधतात. माणसाला प्रेम, आदर, कुतघ्नता, आनंद, दुख, इत्यादी सर्व भावना व्यक्त करताना गुलाबाची फुले दिली जातात. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाती, विविध रंगछटा, आणि सुवास असल्यामुळे या फुलांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने केला जातो. आयुर्वेदात गुलाबाच्या औषधी गुणधर्माविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. गुलाब सभोवतालचे वातावरण शांत, प्रसन्न, आणि शुद्ध ठेवत असल्यामुळे अलीकडच्या औद्योगिक क्रांतीच्या युगातही गुलाबाच्या फुलांचा वापर शोभेसाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी होतो. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, जॅम, जेली, सरबत, गुलकंद, तसेच उच्च प्रतीचे मद्यही तयार करतात.
गुलाबाच्या पाकळ्यांमधील साखर आजारी माणसांसाठी उत्तम समजली जाते. त्यामुळे गुलाब हे व्यापार व आहाराच्या दृष्टीने एक महत्वाचे फुलपीक आहे. आधुनिक युगात गुलाबाची फुले ‘कट फ्लॉवर’ म्हणून वापरतात. फुलांच्या एकूण उलाढालीत जगात गुलाबाचा पहिला नंबर लागतो. जगात नेदर्लंड, जर्मनी, इंग्लंड, कोलंबिया, केनिया, भारत, टांझानिया या देशांमध्ये गुलाबाची व्यापारी पद्धतीने शेती केली जाते. भारतात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आणि गुजरात या राज्यात गुलाबाचे कट फ्लॉवर्ससाठी उत्पादन घेतले जात असून महाराष्ट्र लांब दांड्यांच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. परदेशात तसेच देशातील विविध भागात गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे गुलाब हे भरपूर उत्पन्न मिळवून देणारे फुलपीक आहे. अशा या फुलपीकाची शेती कशी केली जाते याविषयी आपण माहिती घेणार आहोत