कावळा, पिशवी, चप्पल,गुलाब.
या शब्दांपासून गोष्ट तयार करा. फक्त मराठीतून
Answers
Answer:
हुशार मिनू -
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात मिनू आणि मिनूचे आई बाबा राहत होते. मिनू खूप हुशार, गुणी आणि समंजस मुलगी होती. त्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती मिनूचा रोजचा नित्यक्रम होता. रोज पहाटे उठून तयार व्हायचे. आईला मदत करायची. आणि शाळेत जायचे असा नित्यक्रम तिचा रोज चालला होता. मिनू जवळ शाळेत जाण्यासाठी दप्तर नव्हते. ती कापडी पिशवीतच आपल्या वह्या पुस्तके घेऊन जात असे.
एके दिवशी मिनू शाळेत जात होती. त्यावेळेला तिला रस्त्याने एक गुलाबाचे फुल दिसले. ते बघण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली. अतिशय सुंदर आणि लाल रंगाचे ते फूल होते. तिने अजून समोर नजर टाकली. तिला गुलाबांच्या फुलांची खूप मोठी बाग दिसली. त्या फुलांकडे बघून ती खुश झाली. आणि त्या बागेच्या दिशेने ती जायला लागली. वाटेत जात असताना अचानक तिच्या पायातील चपलेला काटा रुतला. तिने जोरात म्हटले, आई ग! काटा रुतला. पण तिचे लक्ष त्या बागेतील फुलांकडे होते. बागेच्या बाजूलाच एक छोटेसे तळे होते. तळ्यातील पाणी स्वच्छ होते. सूर्याच्या प्रकाशात ते पाणी चमकत होते. त्या तळ्याजवळ एक कावळा पाणी पीत होता.
मीनूला ते दृश्य अतिशय नयनरम्य असे वाटले. पण या सर्व गोष्टींमध्ये ती एक विसरून गेली होती. की तिचा घरी जाण्याचा रस्ता कुठल्या दिशेने आहे. त्या तळ्याजवळ एक बागेचा माळी बसलेला होता. मीनूच्या अचानक लक्षात आले की, अरे आपण इथपर्यंत आलो. पण आता घरी जायचा रस्ता कसा शोधायचा. म्हणून ती घाबरली आणि रडायला लागली.
तेवढ्यात त्या बागेचा जो माळी होता त्याचे लक्ष मिनूकडे गेले. त्याने मीनूला विचारले का रडत आहे मुली तेव्हा मी उत्तर दिले की मी माझ्या घराचा रस्ता विसरले आहे त्याने सांगितले काळजी करू नकोस मी तुला तुझ्या घरापर्यंत पोहोचवून देईल मग मीनूच्या अचानक लक्षात आले की आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावर आपल्या पायांचे ठसे उमटलेले असतील त्या दिशेने आपण मार्ग काढू या मिनू आणि त्या माळी बुवाने रस्त्याने मीनूच्या पायांचे ठसे बघत मार्ग शोधला. आणि मिनू आणि तो माळी दोघेही मिनू च्या घरी परत गेले.