काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास ........................
(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास ........................
(इ) मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास ........................
(ई) लेखकाच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास ........................
Answers
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "थोडं 'आ' भारनियमन करूया" या पाठातील आहे. या कवितेच्या लेखिका मंगला गोडबोले ह्या आहेत. वरकरणी गंमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशाप्रकारे विनोद निर्माण करतो , यावर लेखिकेने प्रस्तुत पाठात प्रकाश टाकला आहे.
★ काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
(अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास
उत्तर- आदर मनात तुडुंब भरून असल्यास तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो.
(आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास
उत्तर- खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो.
(इ) मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास
उत्तर- मित्र-मैत्रिणीने आभार मानल्यास प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धपका मिळतो.
(ई) लेखकाच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास
उत्तर- लेखकाच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास काही सुधारणा करता आली तर बघू.
धन्यवाद...