कायिक विदरणामुळे अपपर्णनाची क्रिया कशामुळे घडून येते
Answers
Answer By Amit
कायिक विदारण
खडक फुटताना त्यांचे कणी विघटन (कणकण वेगळे होणे) होते, अपपर्णन (कांद्यासारखे पापुद्रे निघणे) होते, सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन खडकांचे मोठे ठोकळे अलग होतात किंवा त्यांचा विध्वंस होऊन त्यांचे अणकुचीदार व धारदार तुकडे तुकडे होतात. उष्णतेमुळे खडक तापतात व प्रसरण पावतात. ते निवले म्हणजे आकुंचन पावतात.
आकुंचन-प्रसरणाची ही क्रिया वारंवार दीर्घकालपर्यंत होत राहिली म्हणजे खडकांच्या कणाकणांमध्ये ताण व दाब निर्माण होऊन अखेर खडक फुटतो. आलटून पालटून तापण्यानिवण्यामुळे खडक फुटणे, त्याचे लहानमोठे तुकडे होणे व शेवटी त्यांची वाळू बनणे ही क्रिया विशेषतः उष्ण कटिबंधीय मरुप्रदेशांत–वाळवंटांत दिसून येते. तेथे दिवसाच्या व रात्रीच्या तपमानांत मोठा फरक पडतो.
खडकाचा बाहेरचा भाग आतल्या भागापेक्षा जास्त तापतो व निवतो, तसेच खडकाच्या घटकद्रव्यांचे प्रसरण-आकुंचनही कमीजास्त प्रमाणात होते. याचा परिणामही त्याच्या कणाकणांत ताण व दाब निर्माण होऊन तो फुटण्यात होतो. खडकाचे कण किंवा लहान मोठे तुकडे त्यापासून अलग होऊन त्याच्या पायथ्याशी साचतात आणि खडकाचा आतील नवीन पृष्ठभाग उघडा पडून त्यावर विदारणाची क्रिया चालू राहते.
खडक क्वार्टझाइट किंवा चुनखडक यांसारखा एकजिनसी असला, तर तो याप्रमाणे न फुटता त्यावर फुगवटी येते आणि तापल्यावर त्याचा पातळसा पापुद्रा सुटतो; अपपर्णन होते. खडकाचे कणी विघटन, गोलाकार किंवा कांदेपापुद्री विदारण इ. गोष्टी केवळ तापण्यानिवण्यामुळे होत नसून त्याला आर्द्रतेची जोड असावी लागते असे आता दिसून आले आहे; कारण भूपृष्ठापासून बऱ्याच खोलवर जेथे सूर्याची उष्णता पोहोचणे शक्य नाही, तेथेही हे प्रकार घडलेले दिसून आले आहेत.
पाणी गोठणे : काही वेळा विशेषतः थंड हवेच्या प्रदेशांत, खडकांच्या भेगांत किंवा जमिनीच्या कणाकणांच्या दरम्यानच्या जागेत शिरलेले पाणी गोठते. गोठणारे पाणी जास्त जागा व्यापते. त्यामुळे भेगेच्या बाजूंवर किंवा मातीच्या कणांवर मोठा दाब पडतो. त्यामुळे भेगा रुंदावतात, जमीन भेगाळते व अखेर खडक फुटतो.
रुक्ष, कोरड्या हवेच्या प्रदेशात दीर्घकालीन अवर्षणकाळात जमिनीखालचे पाणी केशाकर्षणाने पृष्ठभागी येते. पाण्याचे बाष्पीभवन होऊन क्षार उरतात. क्षारांचे स्फटिक बनताना ते बर्फाच्या स्फटिकाप्रमाणेच दाब निर्माण करतात. यामुळे वालुकाश्म प्रदेशात खडकांत लहानमोठे खळगे, कोनाडे, उथळ गुहा इ. प्रकार दिसून येतात.
अशा गुहांसारख्या जागांचा उपयोग वन्यप्राण्यांना व माणसांनाही आश्रयस्थाने म्हणून होतो. पावसाळ्यात गाळ व माती पाणी शोषून घेतात व फुगतात. कोरड्या ऋतूत त्या आक्रसतात. हेही कायिक विदारणच होय. चिकणमातीयुक्त गाळखडकात हा प्रकार चांगला दिसून येतो.
विदीर्ण खडकाचा चुरा डबर म्हणून डोंगर-टेकड्यांच्या पायथ्याशी शंकूसारखा साचतो. त्यात आणखी भर पडली म्हणजे काही डबर उतारावरून आणखी खाली घसरते. पुढे ते पावसाच्या पाण्याने किंवा वाऱ्याने दुसरीकडे वाहून जाते
please mark me as a brainliest thankyou