India Languages, asked by rupalishrigiriwar, 4 months ago

काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते​

Answers

Answered by RajkapurBhardwaj
15

Answer:

लोककवी अशी उपाधी मिळालेले डॉ. विठ्ठल वाघ हे वऱ्हाडातील लोकजीवनाचे वास्तववादी चित्रण मांडणारे साहित्यिक आहेत. मराठी सारस्वातात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. कवयीत्री बहिणाबाई चौधरी यांच्या लोकवाणीनंतर घराघरात प्रसिद्धीस पावल्या त्या डॉ. विठ्ठल वाघ यांच्या कविता... मातीचा सुगंध आणि शेतातील मुक्तवारा घेऊन आलेली त्यांची कविता गावगाड्यात प्रत्येकाला आपलीसी वाटत राहिली. आजही त्यांच्या कविता लोकांच्या तोंडी आहेत... अतिशय संवेदनशील मन असलेल्या डॉ. विठ्ठल वाघांनी वऱ्हाडातील ग्रामीण जीवन कवितेच्या माध्यमातून अतिशय उत्कट अन् समर्पकरित्या कागदावर उतरविले. त्यांच्या शब्दाला धार आहे तसे लोकगीतांची लयही आहे... ग्रामीण जीवनसंस्कृती, शेती, शेतकरी, त्यांचे सुख-दुःख, कष्ट, वेदना यांचा विठ्ठल वाघ यांनी अतिशय सक्षमपणे वेध घेतला आहे...

Similar questions