Art, asked by misarsaurav358, 1 day ago

५) कायदा आणि सुव्यवस्था.निबंध

Answers

Answered by adesaloni03gmailcom
3

Explanation:

प्रत्येक घटनेचं कारण वेगळं, परिस्थिती निराळी.. पण ही परिस्थिती हाताळणारे अधिकारी आणि यंत्रणा कायद्यानं ठरवून दिल्याप्रमाणेच, आणि ‘जमावाची मानसिकता’देखील थोडय़ाफार फरकानं तीच! कठीण प्रसंगांत निर्णय घेण्याचं कसब पणाला लागतं आणि राजकीय हस्तक्षेप नसेल तर प्रसंग योग्यरीत्या हाताळल्याचं समाधानही सनदी अधिकाऱ्यांना मिळतं.. गणित थोडं बिघडलं तर मात्र जिवावरही बेतू शकतं..

सगळ्या चित्रपटांमधून किंवा वृत्तपत्रांच्या लिखाणांमधून सारखा सारखा डोकावणारा शब्द म्हणजे ‘कायदा आणि सुव्यवस्था’. हा कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे काय? याची सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंत त्याची अंमलबजावणी कशी होते ते आपण पाहू. कायदा आणि सुव्यवस्था (Law & order) याची संकल्पना इंग्रजांनी आखली. पण याचा अर्थ असा नाही की त्यापूर्वी कायदाही नव्हता आणि सुव्यवस्थाही! त्यापूर्वी कायदा हा प्रत्येक राज्याचा वेगळा होता. हिंदू राजांची कायदाप्रणाली वेगळी होती आणि मुसलमान किंवा आदिवासींची वेगळी होती. जसजशी राज्यं खालसा होत गेली, इंग्रजांना या सगळ्यांच्या व्यवस्थापनाची चिंता लागली. इतका मोठा देश आणि त्याला सामावणारे अनेक कायदे, असं चालणं अवघड होतं. युरोपमध्ये त्याच काळामध्ये ‘कायद्याचं राज्य’ (Rule of Law) ही संकल्पना दृढ होत चालली होती. तीच व्यवस्था त्यांनी भारतामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला. या संकल्पनेचे दोन स्तंभ आहेत. एक म्हणजे ‘सगळे लोक कायद्यापुढे समान आहेत.’ हा फार महत्त्वाचा पायाभूत फरक होता. भारतीय व्यवस्था आणि या नवीन व्यवस्थेमध्ये भारतीय पद्धतीमध्ये राजा, त्याच्या परिवार आणि परिजनांनासुद्धा समान कायदा लागू होत नसे. त्यांना कायद्याच्या वर ठेवले जात. अर्थात युरोपातही पद्धत फार वेगळी नव्हती. तिथंही ही नवीन व्यवस्था लागण्याआधी अशीच संकल्पना होती. पण या ‘कायद्यापुढे सगळे समान’ पद्धतीमध्ये कायद्याचं स्वतंत्र नियंत्रण आणि अवलंबन करणं सोपं झालं.

कायद्याचं राज्य आल्यावर त्याच्या अवलंबनासाठीची तरतूद करणं हे क्रमप्राप्त होतं. एक म्हणजे कायदा आणि व्यवस्था बिघडू नयेत म्हणून असणारी व्यवस्था आणि कायद्याला तोडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणारी व्यवस्था अशा दोन व्यवस्थांचा उगम झाला. पहिली व्यवस्था, जिल्हा पातळीवर कार्यकारी अधिकारी आणि दंडाधिकारी पद्धतीने अवलंबली गेली तरी दुसरी व्यवस्था न्यायिक (ज्युडिशिअल) व्यवस्था म्हणून विकसित झाली. आता जिल्हा स्तरावर बोलायचं झालं तर जिल्हाधिकारी हा ‘कायदा आणि सुव्यवस्थेची’ जबाबदारी सांभाळणारा सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी झाला. इतकंच नव्हे तर प्रशासनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे झालं. या कायद्याची अंमलबजावणी ठीक होते की नाही हे पाहण्यासाठी पोलीस व्यवस्था आली. पोलीस यंत्रणा हे एक ‘इन्स्ट्रुमेंट’ झालं ही व्यवस्था सांभाळण्यासाठीचं. त्याचा जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधीक्षक झाला. जिथं पोलीस आयुक्त असतात, तिथं दोन्ही कार्यकारी पोलीस व्यवस्था तेच करतात. या सगळ्यांच्या पाश्र्वभूमीवर अशीच व्यवस्था प्रांत आणि तहसील स्तरांवरही करण्यात आली. प्रत्येक ठिकाणचा ‘पोलीस कायदा’ अस्तित्वात आला. भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि भारतीय क्रिमिनल प्रोसिजर संहिता (सीआरपीसी) अस्तित्वात आली.

दीडशेपेक्षा जास्त र्वष झाली ही व्यवस्था येऊन, पण कुठल्याही प्रकारचा मापदंड एखादी लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर सिच्युएशन हाताळण्याकरता होऊ शकला नाही. त्याची प्रोसीजर तयार झाली, पण अमुक एक दंगल ही अशा अशा प्रकारे सांभाळून संपुष्टात आणू शकू, अशी व्यवस्था बनवणं अवघड होतं, याचं कारण प्रत्येक अशी घटना परिस्थितीजन्य असते. प्रत्येक घटनेचं कारण वेगळं असतं, त्यामध्ये सामील होणाऱ्या लोकांची संख्या, स्वरूप, जाती, व्यवस्था वेगवेगळी असते. त्यामुळे या दंगलींना किंवा अशा घटनांना हाताळण्याची जबाबदारी उपस्थित कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची असते. ‘जमावाची मानसिकता’ (मॉब सायकॉलॉजी) हा खरं तर प्रचंड अभ्यासाचा विषय आहे. प्रशासन/ शासनापुढे कायद्यानुसार सरळसोट चालणारी माणसं जेव्हा जमावाचा हिस्सा बनतात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय बनू शकतील, हे समजण्याच्या पलीकडे असतं. इंग्रजांच्या काळापासून अशा जमावाला हाताळण्याचे ठोकताळे त्यांनी मांडून ठेवले होते. ते आजही जिल्हा प्रशासनामध्ये वापरले जातात. पण हा प्रक्रियेचा (प्रोसेसचा) भाग झाला; अंतिम निर्णय हा स्थानिक अधिकाऱ्यांच्या विवेकामधूनच घेतला जातो.

Answered by tiwariakdi
0

कायदा आणि सुव्यवस्था आपल्यासाठी हवेइतकीच महत्त्वाची आहे. आणि ते तितकेच अदृश्य आहे या अर्थाने आपण याबद्दल क्वचितच विचार करतो.

आपण आपल्या घरात राहतो आणि सुखाचे जीवन जगतो, पण कसे? कारण अशी काही कायदा आणि सुव्यवस्था आहे जी आपल्याला हिंसा आणि हल्ल्यापासून संरक्षण देते. अशी यंत्रणा दंगल घडवून आणली असती तर आपण फार पूर्वीपासून दरोडेखोर, चोऱ्या, चोर आणि इतरांनी हैराण झालो असतो.

प्राचीन समाजात, केवळ आरोग्यविषयक जागरुकता नसल्यामुळे आणि वैद्यकीय सुविधा नावाला किंमत नसल्यामुळे आयुष्य कमी होते, परंतु सामान्य लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करू शकणारी कोणतीही सुस्थापित कायदा आणि सुव्यवस्था नसल्यामुळेही. त्यामुळे, लूट, सूड, मत्सर इत्यादी क्षुल्लक गोष्टींवरून अनेक होतकरू तरुणांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच मारण्यात आले.

शतकानुशतके कायदा आणि सुव्यवस्थेची आधुनिक व्यवस्था विकसित झाली आहे. कोणत्याही परकीय देशाच्या हल्ल्यापासून आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आमच्याकडे आमचे सैन्य दल आहे. आपल्या देशात चोर, दरोडेखोर, पाकिटमारी, दरोडेखोर, हायवेमन, खुनी इत्यादींसह सर्व असामाजिक घटकांना पकडण्यासाठी सुसंघटित आणि प्रशिक्षित पोलीस दल आहे.

C.E.M म्हणून जोड यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध निबंधात लक्ष वेधले आहे की, कायदा आणि सुव्यवस्था नसती, तर आधुनिक युगात जीवन जगण्यायोग्य आणि आनंद देणारी सर्व कलात्मक आणि वैज्ञानिक प्रगती अशक्य झाली असती.

#SPJ5

learn more about this topic on:

https://brainly.in/question/49857372

Similar questions