Social Sciences, asked by gopichandkarne2607, 2 months ago

कबड्डी खेळात मिळालेले प्रावीण्य/अनुभव​

Answers

Answered by rajraaz85
2

Answer:

आज का कबड्डी हा खेळ सर्व भारतात खेळला जातो. मला लहानपणापासूनच कबड्डीची फार आवड होती. माझे बाबा कबड्डी मध्ये चॅम्पियन होते आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी मी कबड्डी या खेळामध्ये माझे करियर करायचे ठरवले. मी लहान असताना जर कबड्डी ची मॅच चालू आहे असे माहित पडले तर मी तसाच मैदानावर मॅच बघण्यासाठी धावत सुटायचो. पूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून खेळाडूंच्या खेळण्यावर लक्ष ठेवत असे.

पहिल्यांदा मला असे सांगण्यात आले की तुला जर कबड्डी खेळायचे असेल तर ते आधी तुझेच शरीर तंदुरुस्त मजबूत आणि लवचिक असले पाहिजे तरच तू खेळू शकतो. मग मी ठरवले काही झाले तरी मी कबड्डी खेळणार आणि वयाच्या दहाव्या वर्षापासून कबड्डी चे धडे घेतले.

माझे कबड्डीचे प्रशिक्षक निनाद कुलकर्णी यांनी मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी चे नियम कशी खेळली जाते हे सर्व शिकवले. माती मध्ये कबड्डी खेळण्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता आणि जणू काही ती माता आपल्याला यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देते असे वाटते.

मला आजही आठवते मी पहिल्यांदाच शाळेत आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत भाग घेतला होता मी पूर्ण जिद्दीने चिकाटीने खेळलो होतो तेव्हा शाळेतील शिक्षकांना माझ्या कबड्डी खेळण्याचे नाविन्य फार आवडले तेव्हापासून सर्व शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले. कुठेही कबड्डीची स्पर्धा असली तर माझे नाव सर्वात प्रथम दिले जायचे आणि ते बघून मला फार आनंद व्हायचा.

पुढे मी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला लागलो. राज्यस्तरीय स्पर्धेत कबड्डी मध्ये माझी एक उत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती त्यावेळेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मला बक्षीस देण्यात आले. माझी छाती अभिमानाने फुलून आली होती पुढे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मी बाहेरगावी जायला लागलो आई बाबांचा आणि माझ्या सरांचा माझ्या यशामध्ये खूप अनमोल वाटा आहे हे मी कधीच विसरणार नाही.

Similar questions