कचराकुंडीची नियमित सफाई व
औषधफवारणीची मागणी करणारे पत्र आरोग्य
खात्याला लिहा.in Marathi
Answers
उत्तर :
पत्रलेखन (औपचारिक)
बी-७०१,
अजमेरा अरिया,
कोरेगाव पार्क ,
पुणे -४११००१
दिनांक - ०१/०३/२०२०
प्रति,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
पुणे महानगरपालिका,
पुणे -४११००१
विषय :- कचरा कुंडीची नियमितपणे सफाई करणे तसेच औषध फवारणी करणे बाबत.
माननीय महोदय / महोदया,
मी श्री ऋत्विज खुराणा, कोरेगाव पार्क येथे राहतो. बर्याच दिवसांपासून आमच्या विभागात असलेल्या कचराकुंडीची साफ-सफाई नियमितपणे होत नाही. बर्याचदा दोन दोन दिवस तिथे महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकत सुद्धा नाहीत. परिणामतः कचराकुंडी तुडुंब भरून कचरा आजूबाजूला पसरतो. त्यामुळे मोकाट कुत्री जनावरे तिथेच वास्तव्य करतात. या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
आमचा विभाग पुण्यातील नामवंत तसेच प्रसिद्ध विभागांपैकी एक आहे. परंतु अशा या परिस्थितीमुळे वेगळीच प्रतिमा तयार होत आहे. सध्या डेंगू आणि मलेरिया या रोगाने थैमान घातलेले दिसून येत आहे. त्यासाठी आवश्यक ते औषध फवारणी करून त्यावर प्रतिकार करता येईल आणि ते औषध फवारणी वेळेवर करावी आणि कचरा कुंडीची नियमितपणे साफ-सफाई पण करून द्यावी यासाठी विनंती.
"स्वच्छता असे जेथे ,लक्ष्मीचा वास असे तिथे"
या उक्तीप्रमाणे जर स्वच्छता ठेवली तर सर्वांना हितकारक ठरेल. तरी आपण जातीने लक्ष द्यावे ही नम्र विनंती.
आपला,
ऋत्विज खुराणा.
Answer:
it is your correct letter.