India Languages, asked by shubhamsks6739, 10 months ago

kachra Ek Gambhir samasya मराठी निबंध

Answers

Answered by halamadrid
5

■■"कचरा एक गंभीर समस्या "■■

कचरा एक गंभीर समस्या बनले आहे,कारण कचऱ्यामुळे मनुष्याच्या तसेच पशु पक्षींच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात.

कचऱ्यामुळे माती दूषित होते.कधीकधी कचऱ्यामधील हानिकारक रसायने मातीमध्ये घुसतात.कचऱ्यामुळे वायुप्रदूषण होतो,परिसरात घाण वास पसरतो.

कधीकधी कोणतेही उपचार न करता कारखान्यांमधून निघणाऱ्या कचऱ्याला तसेच पाण्यात सोडले जाते,ज्यामुळे जल प्रदूषण होते. यामुळे जलचर जीवनावरही वाईट परिणाम होतो.

कचऱ्यामध्ये आजार पसरवणारे जंतू असतात.तसेच उंदीर आणि मच्छर कचऱ्यावर वावरतात,त्यांच्यामुळे गंभीर व घातक आजार होऊ शकतात.

अशा प्रकारे,कचऱ्याचे खूप दुष्परिणाम आहेत आणि त्यामुळे आपण कचऱ्यावर योग्य उपचार तसेच त्याची नीट व्यवस्था केली पाहिजे.

Similar questions