India Languages, asked by AnujMalik7289, 21 days ago

*कडाक्याच्या थंडीतही काम करणारा शिष्य -*

Answers

Answered by subhajitsengupta1627
0

Answer:

गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. इतिहासात अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या. इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, ज्या जगभरात कायम लक्षात राहतील. पृथ्वीच्या अंतापर्यंत या गुरु आणि त्यांच्या शिष्यांबद्दल कायम बोलले जाईल. जाणून घेऊया...

Explanation:

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. अगदी प्राचीन काळापासून गुरु-शिष्यांचे अतूट नाते आपल्याला पाहायला मिळते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. इतिहासात अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या. आधुनिक काळातही अनेक गुरु-शिष्य आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा शिष्यामुळे गुरुचे नाव मोठे झाल्याचेही पाहायला मिळते. गुरुने दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश, प्रगती, कीर्तीसह लोककल्याणासाठी झटतो, तोच खरा शिष्य, असे मानले जाते. आजच्या काळात गुरु आणि शिष्य यांच्या व्याख्या अतिशय बदलल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, ज्या जगभरात कायम लक्षात राहतील. पृथ्वीच्या अंतापर्यंत या गुरु आणि त्यांच्या शिष्यांबद्दल कायम बोलले जाईल. जाणून घेऊया...

गुरु वशिष्ठ-श्रीराम

वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरु होते. राजा दशरथ आणि श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचेही गुरु होते. वेद, पुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम, प्रचंड पराक्रमी बनवले. श्रीरामांसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही अतूल्य मार्गदर्शन केले. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषिंमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

गुरु रमात्मा परेशू! जाणून घ्या गुरुपूजन, गुरुमहती आणि गुरुमहत्त्व

महर्षी व्यास-शुक, वैशंपायन

परंपरागत उल्लेखांनुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ म्हणतात. याशिवाय व्यासशिक्षा, ब्रह्मसूत्रे, महाभारत, पुराणे, व्यासभाष्य आदी ग्रंथांचे कर्ते तेच समजले जातात. व्यासांच्या नावावर वेदव्यासस्मृती नावाचा एक स्मृतिग्रंथही आहे. महर्षी व्यासांचा जन्म आषाढी पौर्णिमेला झाल्याची मान्यता आहे. महाभारतातील उल्लेखावरून स्वत: व्यासांनी २४,००० श्लोकांचे उपाख्यानविरहित भारत रचिले व त्यांचा शिष्य वैशंपायन याने त्यात आख्यानोपाख्यानादिकांची भर घालून त्याला सुमारे एक लाख श्लोकसंख्या असलेल्या सध्याच्या महाभारताचे रूप दिले, असे आढळून येते. व्यासांनी त्यांच्या चार शिष्यांपैकी प्रथम शुकाला महाभारत शिकविले, असे सांगितले जाते.

सामान्यापासून असमान्यापर्यंतचा प्रवास म्हणजे नरेंद्र ते विवेकानंद

भगवान परशुराम-भीष्म, द्रोणाचार्य

विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आणि सात चिरंजीवांपैकी एक मानले जाणारे परशुराम. महादेव शिवशंकरांनी त्यांना शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम धनुर्विद्येत विशेष निष्णात होते. परशुरामांनी भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धनुर्विद्या शिकविली. नंतर द्रोणाचार्यांनी ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकविली, असेही महाभारतात म्हटले आहे. याशिवाय कर्णाने स्वतः परशुरामांची सेवा करत अनेक विद्या शिकून घेतल्या, असाही उल्लेख आढळतो. परशुराम सप्तचिरंजिवांपैकी एक मानले गेल्याने रामायण, महाभारत आणि निरनिराळ्या काळातील घटनांशी त्यांचा संबंध जोडलेला आढळतो.

काय सांगता... सापशिडी खेळाचा शोध संत ज्ञानेश्वर माऊलींनी लावलाय!

गुरु द्रोणाचार्य-कौरव, पांडव

कौरव–पांडवांचे धनुर्विद्येतील गुरु व भारतीय युद्धातील कौरवांचे एक सेनापती म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख आढळतो. सर्व कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्यादिकांत त्यांनी निष्णात केले. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्टिराला रथयुद्ध व नकुलसहदेवांना क्षेत्ररक्षण शिकविले. एकलव्य या शबरीपुत्रास त्यांनी विद्या शिकविली नाही, तरी त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येत अर्जुनापेक्षाही पारंगत झाला.

नेपाळमधील शेषशायी विष्णूच्या मंदिराचे 'हे' रहस्य माहित्येय? वाचा

सांदीपनी ऋषी-श्रीकृष्ण, बलराम

श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरुकूल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या. वेद-पुराण यांच्यासह धर्मातील अनेक गोष्टींची भरपूर माहिती दिली, असे सांगितले जाते. संदीपनी म्हणजे देवांचे ऋषी, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. उज्जैन येथे सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही अस्तित्वात आहे.

महाभारत युद्ध भूमीवर श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खायचे? वाचा

Similar questions