Hindi, asked by shraddhajana29, 4 months ago

कडू लिंबाच्या काडीला किती पान असतात​

Answers

Answered by ks685
1

Explanation:

Azadirachta indica; कुळ : Meliaceae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही.

कडुलिंब

निंबोळ्या

kadulimb== वर्णन == कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात . पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो.

कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. याच्या अनेक उपयोगांमुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबाचे झाड मोठे म्हणजे सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते. याची पाने हिरवी,मध्यम आकाराची व लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडू असते.

कडुलिंबाच्या झाडाची सावली(छाया) थंड असते. या कडुलिंब झाडाच्या सावलीतील (छायेतील) घर उन्हाळ्यात थंड राहते.

Similar questions