कडधान्य चे पीक व कमी पजःन्य यांचा सहसंबंध जोडा
Answers
Answer:
Explanation:
कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते. असे प्रयोगांती सिद्ध झालेले असून कडधान्य पिकाचे महत्त्व, कमी उत्पादनाची कारणे आणि त्यावर उपाय संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.
कडधान्य पीक हे नैसर्गिक अद्भुत देणगी असून, त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डाळवर्गीय पिकाद्वारे मानवी शरीराच्या सामान्य वाढीसाठी लागणारी प्रथिने मिळतात. जनावरांची उत्पादन क्षमता (दूध, मांस, मेहनत) वाढते, जमिनीचा पोत व मगदूर सुधारतो आणि उद्योगधंद्यांना लागणार्या कच्च्या मालाचा पुरवठा होतो. अशा विविध प्रकारचे उपयोग कडधान्य पिकांमुळे होतात. तसेच कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते, असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.
आहारातील महत्त्व :
डाळवर्गीय पिकांचे विशेष महत्त्व शाकाहारी मानवाकरिता आहे. भारतीय लोकांच्या आहारात सुमारे 10 ते 15 % प्रथिने आणि 20% कार्बनयुक्त ऊर्जा ही कडधान्यांद्वारे मिळते. कडधान्यामध्ये प्रथिनाशिवाय कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्त्वाचे प्रमाणसुद्धा चांगले आहे. शरीरास पचण्यास सुलभ असणारे प्रथिने, लायसिन आणि रिबॉफ्लेवीन कडधान्यात उपलब्ध असतात. तूर व मसुरातील प्रथिने लहान मुलांना व वृद्धांना पचण्यास हलकी असतात. आहारात अमायनो आम्ले ही मूलभूत व अत्यंत आवश्यक असतात. त्यांची उपलब्धता कडधान्यांपासून होते. कडधान्यांच्या कोवळ्या हिरव्या शेंगाचा उपयोग भाजी म्हणून केला जातो, तसेच जनावरांचा आहार म्हणूनही कडधान्य पिके उपयुक्त आहेत.
जमिनीची सुपीकता वाढविणे :
कडधान्य पिकांमध्ये शेतीची सुपीकता वाढविण्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. कडधान्य पिकांच्या मुळावर जिवाणूंच्या असंख्य गाठी असतात. त्या गाठींमध्ये असलेले सूक्ष्म जिवाणू हवेतला मुक्त नत्रवायू शोषून घेऊन पिकाची नत्राची गरज भागवतात व शिल्लक राहिलेले नत्र जमिनित सोडतात. त्यामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते. कडधान्य पिके मुळावरील गाठीतील रायझोबियम जिवाणूंच्या साहाय्याने हवेतील नत्र शोषून घेतात व त्याचे नायट्रेट खतामध्ये रूपांतर करतात. सर्वसाधारणपणे कडधान्य पिके प्रतिवर्षी हेक्टरी सुमारे 380 किलो नत्र हवेतून शोषून घेतात. कडधान्य पिकाची मुळे जमिनीत खोल असल्यामुळे जमिनीत सर्व थरांतून अन्नद्रव्ये व पाणी उपलब्ध होते. तृणधान्यानंतर कडधान्याची लागवड करुन पिकांची फेरपालट केल्याने जमिनीची सुपीकता वाढते व उत्पादन क्षमता टिकून राहते, तसेच उत्पादनात वाढ होते. कडधान्याचा उत्पादन खर्चही फार कमी आहे.
कडधान्यांचे जमिनीत मिसळणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीची सुपीकता व पोत टिकवून ठेवण्यास मदत करतात. उडीद, मूग चवळीचे पीक तयार झाल्यानंतर शेंगाची तोडणी करून ते जमिनीत गाडल्यास त्याचा उपयोग हिरवळीच्या खतासारखा होतो. त्यामुळे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते. कडधान्य पिकांची मुळे, पाने, फांद्या जमिनीत लवकर कुजतात. तसेच पीक काढणीच्या वेळी मुळावरील गाठी जमिनीत राहत असल्यामुळे सुमारे 10 % नत्र जमिनीत मिसळून जाते. हे नत्र पुढील पिकास उपयोगी पडते. तसेच कडधान्य मिश्रपीक म्हणून खूपच चांगले आहे.
भारतात उत्पादित कडधान्यांची उपलब्धता दरडोई 40 ग्रॅमपेक्षा कमी आहे. मानवी आहाराप्रमाणे सर्वसाधारण दरडोई दररोज 140 ग्रॅम कडधान्य असावयास पाहिजे, असे आहार तज्ज्ञाचे मत आहे. त्यामुळे सद्यस्थितीच्या तुलनेत 3 पटींपेक्षा जास्त उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. सध्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास भविष्यातील कडधान्याची गरज त्यापेक्षा जास्तच राहणार आहे.