Kaeek
vidaran mhanje kay
Answers
Answer:
विदारण म्हणजे अपक्षय किंवा झीज.
पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रियेमुळे आणि हालचालींमुळे पृथ्वीवर शिखरे, भूरूपे, नद्या, हिमनद्या तयार झालेल्या आहेत.
काहीना काही कारणाने या घटकांची झीज होत असते, हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
कायिक विदारण म्हणजे खडक कमकुवत होणे किंवा त्याची झीज होणे होय.
कायिक विदारण हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी खालील कारणामुळे होऊ शकते.
पाणी-पावसाचे प्रमाण जास्त असणाऱ्या प्रदेशात पाणी जमिनीत मुरल्यामुळे खडकाचे विदारण घडून येते.
उष्ण तापमान - ज्या प्रदेशांत तापमान जास्त असते अशा ठिकाणी खडकांचे विदारण घडून येते. उष्णतेमुळे खडकांतील खनिजे प्रसरण पावतात. आणि वातावरण थंड झाल्यावर आंकुचन पावतात.
यामुळे खडकांना तडे जातात व खडक फुटतात.
अति-थंड तापमान- अति थंड तापमानामुळे पाणी गोठून बर्फ बनते. खडकांच्या तडांमध्ये जाऊन बसलेले पाणी बर्फ बनते. आणि त्याचे आकारमान वाढते, पर्यायी खडक फुटतो आणि त्याचे विदारण होते.
Explanation: