Social Sciences, asked by Anonymous, 10 months ago

कल्पनाविस्तार : -असाध्य ते साध्य करिता सायास​

Answers

Answered by Anonymous
8

⠀⠀असाध्य ते साध्य करिता सायास

असाध्य ते साध्य। करिता सायास।

कारण अभ्यास। तुका म्हणे॥

संत तुकाराम महाराज आपल्या भक्तांना सांगतात की, बाबांनो कोणतीही गोष्ट 'असाध्य', म्हणजे न मिळणाऱ्यासारखी नसते. ती मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. ध्रुव बाळाला अढळपद हवे होते, तर त्याला अपरिमित प्रयत्न करावे लागले. ध्रुव बाळाने कडक तपस्या केली, तेव्हाच त्याला यश मिळाले.

कोणत्याही यशामागे असे ‘सायास' म्हणजे 'कष्ट' असतात. शास्त्रज्ञ जेव्हा एखादया क्षेत्रात यश मिळवतात, तेव्हा त्यामागे अनेक वर्षांची तपस्या असते. अंतिम यश मिळण्यापूर्वी पुष्कळ वेळा अपयश स्वीकारावे लागते. अपयश आले तरी आपले यत्न सोडायचे नसतात.

आपल्या रोजच्या जीवनात आपल्या वाट्याला असे अपयश अनेक वेळा येते. पण म्हणून खचून जाऊन आपले प्रयत्न सोडू नयेत. आज आपल्या देशासमोर अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. त्यांनी खचून जाऊन आपण आपले प्रयत्न सोडू नयेत. प्रयत्न चालूच ठेवायला हवेत. तरच आपण आपले ध्येय गाठू शकू!

Similar questions