कल्पनाविस्तार :
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
Answers
Answer:
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुकाराम महाराज वरील ओळींच्या माध्यमातून असे सांगतात की ज्या वेळेस एखादा व्यक्ती मोठेपणा घेतो त्या वेळेस त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते.त्रास घेतल्याशिवाय कुठलाही व्यक्ती मोठा होत नाही.
Explanation:
वरील ओळी या तुकाराम महाराजांच्या अभंगातील वचन आहेत. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला महान बनायचे असेल किंवा मोठेपणा घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याने आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड दिले पाहिजे. कारण मोठेपणा सहज मिळत नाही. मोठेपणा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कष्टातून किंवा त्रासातून जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. ज्याप्रमाणे एखाद्या दगडाची मुर्ती बनते, त्यावेळेला मूर्ती बनण्यासाठी त्या दगडाला ही अनेक घाव सहन करावे लागतात. परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला अनेक गोष्टी त्या सोडून द्यावे लागतात व आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागते तरच त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात की कुठलीही गोष्ट ही सहज साध्य होत नाही त्यासाठी अफाट असे कष्ट घ्यावे लागतात.