कल्पनाविस्तार लिहा केल्याने होत आहे रे!
Answers
⠀⠀⠀⠀⠀केल्याने होत आहे रे!
केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।। ही समर्थ रामदासांची काव्यपंक्ती आहे. या काव्यपंक्तीतून त्यांची सर्वसामान्यांना फार मोठा उपदेश केला आहे. काही माणसे अशी असतात की, हे आपल्याला जमणारच नाही, असे म्हणून ती एखादया कामाला सुरुवातच करत नाहीत. काहीजण काम सुरू करतात, पण अडचण आली की, ते काम सोडून देतात. फारच थोडे लोक सुरू केलेले काम कितीही अडचणी उभ्या राहिल्या तरी पूर्णत्वाला नेतात.
समर्थ सांगतात की, कितीही अवघड वाटले, तरी कामाला सुरुवात करावी. काम सुरू केले, तरच ते पुढे सरकते. जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षणाच्या कामासाठी पहिली शाळा काढली. त्यामुळेच आज स्त्रिया एवढ्या शिकू शकतात. वैज्ञानिक क्षेत्रात आज एवढी प्रगती झाली आहे. माणूस अंतराळात जाऊन पाहोचला आहे. याचे श्रेय अनेक शास्त्रज्ञांच्या संशोधनातच आहे. त्यांनी त्या दृष्टीने संशोधन सुरू केले नसते, तर आजही माणूस रानटी अवस्थेतच राहिला असता. तेव्हा कोणत्याही क्षेत्रात प्रगती हवी असेल तर त्या दृष्टीने पहिले पाऊल आपण टाकलेच पाहिजे. प्रयत्न हाच परमेश्वर!