कल्पनाविस्तार लिहा प्रयत्ने वाळूचे कण...
Answers
Answered by
7
⠀⠀⠀⠀⠀प्रयत्ने वाळूचे कण
पुष्कळ वेळा आपल्याला असे वाटते की, अमुक एक काम आपल्याला जमणारच नाही. मग आपण ते सुरू करतच नाही. वर्गात अशी बरीच मुले असतात की, त्यांच्या मते, गणित हा विषय फार अवघड आहे. मग ते त्या विषयाकडे वळत नाहीत. प्रयत्नच करत नाहीत. त्यांनी हे लक्षात ठेवावे की-
असाध्य ते साध्य। करिता सायास।
कारण अभ्यास। तुका म्हणे।।
संत तुकाराम म्हणतात की, आपण प्रयत्न केला, तर जे असाध्य वाटत असते, तेही प्राप्त होते. फक्त प्रयत्न केला पाहिजे. गौरीशंकर शिखरावर माणूस कधी जाऊ शकेल, असे वाटत नव्हते. पण प्रयत्न केला आणि माणसे तेथवर पोहोचली. माणूस आज अंतराळाचा वेध घेऊ शकला आहे आणि अथांग सागराच्या तळाशी तो डुबकीही मारू शकतो.
'अशक्य' हा शब्द माझ्या शब्दकोशातच नाही, असे म्हणणाराच जगज्जेता झाला. म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने लक्षात ठेवावे की, प्रयत्न करणाऱ्याकडेच यश धावत येते.
Similar questions