कल्पनाविस्तार लिहा : - विदयेविना मती गेली
Answers
⠀⠀⠀⠀विदयेविना मती गेली
महात्मा जोतीराव फुले यांनी हा संदेश दिला आहे- 'विदथेविना मति गेली.' विदथेचे महत्त्व महात्मा फुले यांनी जाणले होते. निरक्षर माणसांचे नुकसान होते. त्यांची सर्वांकडून फसवणूक होते. निरक्षर माणूस जे काम करत असतो, त्याबद्दलचे अधिक ज्ञान त्याला मिळवता येत नाही. त्यामुळे आपल्या कामात त्याला विशेष नैपुण्य प्राप्त करता येत नाही.
निरक्षरता हा आपल्या देशाला लागलेला मोठा कलंक आहे. बहुसंख्य लोक अशिक्षित असल्यामुळे आपल्या देशाचा व्हावा तसा विकास होत नाही. अशिक्षितपणामुळे अनेक दोष निर्माण होतात. अनेक अंधश्रद्धा वाढीला लागतात. कोणत्याही आजाराची साथ आली, तर योग्य वैदयकीय उपचार न करता, लोक अगार धुपारे, गंडे दोरे यांसारखे भ्रामक उपाय करत बसतात, आदिवासी लोकांनाही शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांची प्रगती होत नाही,
माणसाला शिक्षण मिळाले की, तो आपली प्रगती करू शकतो. घरातील स्त्री बत असेल, तर ती आपल्या मुलांना अशिक्षित ठेवणार नाही, म्हणून महात्मा पाना मुलींच्या शाळा काढल्या. आजचे युग हे संगणक युग आहे. आजचे युग हे सध्या स्पर्धच युग आहे. या स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल, तर विदया ही हवीच!