कल्पनाविस्तार : - ६. मराठी असे आमुची मायबोली
Answers
⠀⠀⠀⠀मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली।
जरी आज ती राज्यभाषा नसे।।
कवी माधव जूलियन यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील या पंक्ती. मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान असतो. मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो वा धर्माची असो. मराठी भाषेची समृद्धी सर्वांनी मान्य केली आहे.
संत ज्ञानदेव सांगतात की, माझ्या मराठी भाषेचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की, ती अमृतालाही पैजेवर जिकेल. मराठी भाषा एवढी साजिरी गोजिरी आहे की, ती सर्व भाषांत श्रेष्ठ आहे, असे एक कवी म्हणतात.
आमची मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. मराठी भाषेतील साहित्यही विपुल आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या संतांची भक्तिपर रचना, शाहिरांचे पोवाडे, स्त्रियांनी रचलेल्या घरगुती ओव्या, त्यानंतरची आधुनिक कविता, कथा, कादंबरी इत्यादी विविध प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात आहे. याशिवाय अनेकांची चरित्रे, आत्मचरित्रे मराठीत वाचायला मिळतात. आजकालचे शोध, संशोधन यांवरील पुस्तकेही मराठीत आता विपुल येत आहेत. मराठी भाषा समृद्ध होत आहे.