Hindi, asked by nadarsermakani, 1 year ago

kalapnradan ravivar sutti nasti tar

Answers

Answered by mane99
13
Ravivari sutti nasti tar bakichya saha(6) divasanpaiki kontya tari eka divashi sutti dili asti...aathavdyamadhe ek sutti dene garjeche aahe...aani nasti dili tar sutti ghetli asti...!!!
Answered by halamadrid
4

Answer:

आठवड्यामधून प्रत्येकाचा आवडता वार म्हणजे रविवार.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच रविवारची वाट पाहत असतात.कधी एकदा रविवार येतो आणि आपल्याला शाळा व ऑफिसला सुट्टी मिळते,असे प्रत्येकाला वाटत असते.

तेव्हा,रविवारची सुट्टी नसती तर, हा विचारच मनात भीती निर्माण करतो.रविवारची सुट्टी नसती तर,आठवड्यातले सगळेच दिवस एकसारखे वाटतील.आपल्याला रविवारी आपल्या कुटुंबासोबत,मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाता येणार नाही.सकाळी उशिरा उठता येणार नाही. आपल्या जवळच्या लोकांसोबत आरामात वेळ घालवता येणार नाही.

आठवड्याच्या सात दिवस काम करत राहिल्यामुळे, आपण खूप थकून जाऊ. शरीर थाकल्यामुळे आजारी पडण्याची भीती वाढेल.स्वतः साठी नीट वेळ मिळत नसल्यामुळे आपण कंटाळून जाऊ.आपला ताण वाढेल.याचा परिणाम आपल्या कामावर दिसू लागेल.

तेव्हा,रविवारची सुट्टी नसली,तर! लोकांना फार त्रास होईल,त्यामुळे रविवारची सुट्टी ही हवीच.

Explanation:

Similar questions
Hindi, 1 year ago