"कमी मार्क्स मिळाल्याने काही फरक पडत नाही" - ही सर्वात घातक अंधश्रद्धांपैकी एक आहे. "पैसा सर्वस्व नाही" ही त्याच पठडीतील दुसरी अंधश्रद्धा. मार्क्स हे लक्षण आहे. अभ्यास कमी केल्याचं. मार्क्स कमी मिळाले म्हणजे तुम्ही गणित, मराठी, इंग्रजी "व्यवस्थित" शिकला नाही आहात. विज्ञानाचे मूलभूत नियम नीट पाठ करून घेतले नाहीत. इतिहास भूगोल समजला नाहीये तुम्हाला. घोकंपट्टी करून मिळालेलं ज्ञान काय कामाचं - हे विचारणं टाळ्या मिळवायला आणि मान डोलवायला छान आहे. पण हीच घोकंपट्टी कितीतरी स्किल्स डेव्हलप करत असते हे कुणी सांगत नाही. ट्रिग्नोमेट्रीचा फायदा काय हा प्रश्न ठीक आहे. पण तो चार्ट पाठ करून त्यावरील गणितं सोडवताना स्मरणशक्ती आणि लॉजिकल रिझनिंगचं नातं मजबूत होत असतं. फार मोठी जमेची बाजू आहे ही. भूगोल धड असेल तर चारचौघात गप्पा मारताना ग्लोबल रेफरन्सेस पटापट उलगडत जातात. मराठी व्याकरण नीट असणं ओव्हरऑल संभाषण कौशल्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगायला हवं का? इंग्लिश स्किल्स व्यवस्थित आहेत म्हणून करिअर बूस्ट झालेले कमी लोक बघितलेत का आपण? एमबीए एन्ट्रान्सची तयारी करताना हे सगळं खूप खूप जाणवलं मला. १२ वी धड न केल्याचे परिणाम इंजिनिअरिंगमध्ये भोगले. पण १० वी पर्यंत स्टार परफॉर्मर असल्याचा फायदा थेट मुंबईतील टॉप १० एमबीए कॉलेजेसपैकी एकाचं प्रवेशद्वार उघडण्यात झाला. स्पोकन इंग्लिश चांगलं असल्यामुळे एमबीए गाजवू शकलो. पुढे नोकऱ्या करताना हेच कमावलेले कित्येक स्किल्स सतत कमी येत गेले. अर्थात, हे सगळं ज्यांना जमलं नाही, ते आज अपयशी आहेत का? अर्थातच नाही. पण आज मिळालेलं यश कमावण्यासाठी त्यांना मोजावी लागलेली किंमत दुर्लक्षित करता येणारे का?! सतत नकारांना सामोरं जावं लागणं, सहज उपलब्ध होऊ शकणारे पर्याय बंद होणं - हे सगळं "काहीच नुकसान नाही" प्रकारात टाकून द्यायचं का? हे सगळं सोडून द्या. परिक्षांमधील मार्क्स एक खूप मोठं पब्लिक स्टेटमेंट असतं. तुम्ही स्वतःला, स्वतःच्या करिअरला किती सिरियसली घेता - याचं जगाला दिलेलं डिक्लेरेशन असतं. इंजिनिअरिंगमध्ये कॅपम्स रिकृटमेन्टला येणाऱ्या कम्पनी १०वी - १२वी चे मार्क्स बघण्यामागे हेच कारण असतं. परीक्षेतील अपयश म्हणजे "सगळं संपलं" असं अजिबात नाही. पण - "राजा, तुला माहिती होतं १०वी/१२वी चं महत्व...तरी तू इतके कमी मार्क्स मिळवलेस...हे तुझं चुकलं आहे...तू कमी पडला आहेस" - हे पण सांगायचं नाही का? तुझ्यासाठी आईवडील, बहीणभाऊ खूप ऍडजस्ट करत होते, त्याग करत होते - त्याची किंमत तू ठेवली नाहीस - ही जाणीव करून द्यायची नाही का? लक्षात घ्या - जर मुलांना आताच ही जाणीव करून दिली नाही तर ते आज भानावर येऊन उद्या सिरियसली पुढचा विचार करणार नाहीयेत. "१० वी १२ वी म्हणजे सर्वस्व नव्हे" - हे कुणासाठी? जो त्या नंतर खूप मेहनत घेतो, त्याच्यासाठी! पण नंतर मेहनत घेण्यासाठी आज त्याला परिस्थितीचं भान यायला नको का? आपल्या "१२ वी म्हणजे सर्वस्व नव्हे! बिनधास्त रहा! मजा कर!" संदेशांमुळे त्याला हे गंभीर्यच येणार नाही - हे कळायला नको का आपल्याला! आपल्या आजूबाजूला १२वीत अपयशी होऊनही पुढे यशस्वी झालेले जितके लोक आहेत - त्याहून अधिक लोक क्षमता असूनही बिलो अॅव्हरेज जीवन जगणारे आहेत. कशामुळे? कारण हे गांभीर्य त्यांना कधीच आलं नाही. हेच हवंय का आपल्याला?! शेवटी, सर्वात महत्वाचा मुद्दा. आज १२ वी होऊन गेलेल्या मुलांना धीर देण्यासाठी तुम्ही हे म्हणताय खरं. पण तुमचं हे म्हणणं ऐकणारे-वाचणारे ८वी, ९वीतले पोरं काय शिकताहेत यातून? त्यांना काय सिग्नल्स देतोय आपण?! "काही फरक पडत नाही मार्क्स कमी मिळाल्याने" असं म्हटल्याने आपण मोठया मेहनतीने, विचार करून उभारलेली अख्खी सिस्टीम आपण एका फटक्यात रद्द करून बसतो - हे कळू नये का आपल्याला?! कोवळ्या जीवांनी परीक्षेतील अपयशामुळे आयुष्य संपवू नये हे योग्यच. पण पुढील आयुष्य घडवण्यासाठी परीक्षा महत्वाच्या असतात - याचं भान ही आवश्यक आहे, हे नाकारून कसं चालेल?! स्पर्धा जीवघेणी नको. मान्य. पण स्पर्धाच नको म्हणून कसं चालेल?! स्पर्धा असणारच! तुम्ही त्यात उतरायचंच नाही असं ठरवलं तरी स्पर्धा तुम्हाला जज करणारच. मानवी अस्तित्वच उत्क्रांतीची स्पर्धा जिंकत जिंकत उभं राहिलं आहे. नाकारून जाणार कुठे ? v. यावरून आपल्याला कोणती प्रेरणा मिळते.पाच सहा ओळीत आपली प्रतिक्रीया सांगावी
Answers
Answered by
0
उत्तरAnswer:-
व्याख्याExpalnation:-
Similar questions