India Languages, asked by Shreeraksha4230, 10 months ago

kapdi pishvi che manogat essay in marathi

Answers

Answered by halamadrid
44

■■ कापडी पिशवीचे मनोगत■■

नमस्कार, मी एक कापडी पिशवी बोलत आहे. आता मी पहिल्यांसारखी चकचकीत सफेद रंगाची नाही राहिली. माझ्यावर थोडे डाग पडले आहेत. पण आधी मी अशी नव्हती.

माझा जन्म एका कारखान्यात झाला होता.तेव्हा मी चकचकीत सफेद रंगाची होती.माझ्यावर सुंदर फुलांची डिज़ाइन होती.माझ्यासोबत माझे इतर मैत्रिणी सुद्धा होत्या.

नंतर आम्हाला सगळ्यांना एका दुकानात विकायला आणले गेले.हळूहळू माझ्या इतर मैत्रिणींना कोणी न कोणी विकत घेतले आणि आम्ही वेगवेगळे होऊ लागलो.

एक दिवशी एका बाईने मला विकत घेतले.त्या दिवशी मी खूप खुश होती. दुसऱ्या दिवशी तिने माझ्यात तिच्या मुलीचा स्कूलचा डब्बा भरला आणि मला तिच्या मुलीच्या हातात दिले.

जेव्हा मालकिणीच्या मुलीने मला शाळेत नेले, तेव्हा तिच्या मैत्रिणी माझ्या सौंदर्याचे कौतुक करायच्या. तेव्हा मला फार आनंद व्हायचा.मला रोज ती मुलगी शाळेत न्यायची,घरी आल्यावर मला व्यवस्थित किचनमध्ये ठेवायची आणि माझी मालकीण मला रोज स्वच्छ आणि साफ धुवायची.

पण, एके दिवशी तिच्या मुलीकडून चूकून माझ्यावर भाजी पडली, ज्यामुळे माझ्या अंगावर तेलाचे डाग पडले. माझ्या मालकिणीने ते डाग काढायचे खूप प्रयत्न केले,पण तिला काही ते जमले नाही.

माझ्या अशा अवस्थेमुळे तिच्या मुलीने माझा वापर करण्यास नकार दिला, मग माझ्या मालकिणीने तिच्यासाठी नवीन पिशवी आणली आणि मला एका कोपऱ्यात टाकून दिले.

मला तेव्हा खूप दुख झाला, पण मी त्यांच्या उपयोगी आली, यातच मला समाधान वाटतो.

तर अशी होती माझी जीवन कथा.

Similar questions