India Languages, asked by rupalimaity77, 19 days ago

कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत

Answers

Answered by jagtappranav2721
9

उत्तर:

कर्ज बाजारी शेतकऱ्याचे मनोगत•

शेतकरी म्हणजे फक्त शेतात राबणारा माणूस नाही तर स्वतःच्या मेहनतीने लोकांसाठी अन्न पिकवणारा देवच म्हणा. शेतकरी शब्द ऐकताच तुमच्या मनात गरीब आणि कष्टाळू येत असेल परंतु माझ्या मनात फक्त अन्नदाता येतो.

मी शहरात राहतो परंतु माझे आजोबा गावाला शेती करतात मी माझ्या निबंधाच्या निमित्ताने म्हणजेच शेतकऱ्याचे मनोगत निबंध लिहिण्यासाठी आमच्या गावालाच गेलो. तिथे माझ्या आजोबांबरोबर मी शेतात गेलो होतो आणि त्यांना सहज शेतकऱ्याचे मनोगत म्हणून विचारले तर त्यांनी सांगितले. माझे नाव जगन्नाथ बोरसे आणि मी भारत देशातील एक शेतकरी आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या गावात शाळा देखील नव्हत्या आणि मी बाबांसोबत शेतात जायचो. तेव्हापासून मला शेतीची आवड निर्माण झाली कारण गरीबाची परिस्थिती असल्यामुळे ना शाळेत जाता येत असे आणि ना दुसरा काही पर्याय होता.

शेतात काम केल्यावर मला खूप मज्जा यायची कारण तिथे काम करणे, दुपारी तिथेच जेवण करणे आणि संध्याकाळी घरी येणे झोप देखील उत्तम लागायची.मी जसजसा मोठा होत गेलो तेव्हा शेतकरी ला एवढी मागणी नव्हती आणि तेव्हा इंग्रजांचे सरकार असल्यामुळे आमचे शेतातील पीक इंग्रज घेऊन जायचे पण त्याचा खूप कमी मोबदला मिळायचा आणि काही आम्ही आमच्या घरासाठी ठेवायचो.

जेव्हा मी तरुण वयात आलो तेव्हा तर आपला देश आजाद झालाच होता आणि आम्ही देखील आजाड झालो होतो पण तस काही दिसेना कारण शेतकऱ्याचे जीवन तसेच होते. पिकाला जेवढा हवा तेवढा मोबदला नव्हता. म्हणजेच शेतकरी आधीपासून फक्त मेहनत च करत आला आहे बसं.

आमचे घर देखील मातीचे होते आणि तेव्हा खेड्या गावात एवढ्या सुविधा सुद्धा नव्हत्या.

जर आताची गोष्ट केली तर जेवढे शेतीत पेरतो तेवढे सुद्धा पैसे येत नाहीत. कष्ट, मेहनत खूप लागते, दिवसभर उन्हात काम करावे लागते.

माझे एक छोटेसे शेत आहे त्यात मी दरवेळेस वेगवेगळे पीक घेत असतो जसे गहू, बाजरी, ज्वारी, मक्का, हरबरे, ई आणि सर्वात जास्त घेत असलेले पीक म्हणजे कापूस. माझ्या शेतात एक विहीर आहे.

जर काही वर्षांपासून पाऊसच पडत नाहीये आणि विहीर सुद्धा आटून गेली आहे तर मग खूपच हाल होता. कारण आमच्या गावात नदी, तळवनही आहे म्हणजे नदी आहे पण ती किती वर्षांपासून आटली आहे तेही लक्षात येत नाही. उन्हाळ्यात तर मग खूपच कठीण काम होते कारण विहीर आटली असते आणि लाईट चे सुद्धा काही खरे नसते ज्याने विहिरीत जेवढे पाणी आहे तेवढे देखील काढणे कठीण होते. पाऊसाचे प्रमाण हे कमी ही नको आणि जास्त ही नको कारण तेव्हाच शेती करणे शक्य आहे.

शेतीचे असे असते जर पीक पिकले तर खूप चांगले पिकते आणि जर पाऊसाने नासाडी केली तर मग शेतकरी कर्जात बुडालाच समजा. असेच मागच्या वेळेस पाऊस पडला होता, खूप जोरदार संपूर्ण कापूस खराब झाला होता. पिकावर रोग चढला होता, सर्व पाने पिवळी पडून गेली होती. तो कापूस वेचायला एक महिना देखील अपुरा पडला होता आणि शेवटी शेवटी तर ते कापसाचे बोंडे एवढे छोटे आणि त्यात कीड पडलेली होती एक रोपाच्या मागे पाच सात मिनिट लागायचे. सर्व कडे शेतकरी फक्त रडत होते कोणावर कर्ज तर कुणी फाशी लाऊन घेतली. शेतकरी म्हटला म्हणजे कर्ज तर असते कारण शेतीत पैसा टाकने म्हणजे सोपे काम नाही.

शेतकरीच एक असा व्यक्ती असतो जो मातीत पैसे टाकण्याची हिम्मत ठेवतो आणि त्याच्यावरच सर्व जग जिवंत राहते.

अजून तर पिकाला भाव देखील मिळत नाही असे तर खूपच वेळेस होते मग शेतकऱ्याने खावे काय आणि शेतात टाकावे काय.

तुम्ही हे असच लिहू शकता किंवा आपल्या भाषेत या आधारे लिहू शकता.

यासारख्या अजून चांगल्या उत्तरासाठी मला FOLLOW करा.

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि त्याचा मान ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.

Please Like this answer (Give Thanks)♥️

Mark the answer as Brainliest.

Follow me for more answers.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

धन्यवाद, Thanks.

Similar questions