कर्जत परिसरात चोर-दरोडेखोरांचा हैदोस नागरिक या नात्याने परिसरातील चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला विनंती पत्र लिहा. परिसरात चोऱ्या-दरोडे होण्याच्या घटनांविरुद्ध परिसरातील एका परिचितांनी केलेल्या प्रयत्नांसाठी किंवा त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. कित
Answers
Answered by
21
Answer:
दामोदर नगर
कर्जत
दिनांक : ४ फेब्रुवारी, २०२२
प्रति,
मा. सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस,
कर्जत पोलिस स्टेशन
कर्जत-८९
विषय -रात्रीची गस्त वाढविण्याबाबत.
माननीय महोदय,
मी कर्जत या शहरातील रहिवासी असून मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या परिसरात काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एखादे घर बंद असेल तर तिथे चोरी होणारच अशी भीती लोकांच्या मनात पसरली आहे.
परिसरातील लोक खूप घाबरले आहेत. कितीही काम असेल तरी चोरांच्या भीतीने लोक बाहेर गावाला जाण्यास टाळत आहेत. एक नागरिक म्हणून मी आपणास विनंती करतो की लवकरात लवकर या कडे लक्ष घालावे व आमच्या परिसरातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा.
मला आशा आहे आम्ही केलेली मागणी लवकर पूर्ण होईल.
आभारी आहोत.
तुमचा कृपाभिलाषी,
गणेश खांडेकर
Similar questions