करावे तसे भरावे कथा in marathi plzz answer it
Answers
एका गावात एक भुरटा चोर रहात होता. चोरी करणं हाच त्याचा व्यवसाय होता. गावात अनेक ठिकाणी चोर्या केल्यानंतर तो आसपासच्या गावात जाऊन चोर्या करू लागला. अशाच एका गावात आला असताना एका मोठ्या घराच्या बाहेर तबेल्यात एक घोडा बांधलेला त्याला दिसला. त्या भुरट्या चोरासाठी ते गाव नवीन होते; आणि अनोळखी असलेल्या या गावात आपल्याला कुणी ओळखणार नाही या समजुतीने त्याने तबेल्यात जाऊन त्या घोड्याचा दोर सोडून कुणाच्याही नकळत त्याला बाहेर आणले आणि रपेट मारत तो शेजारच्या गावात पोहोचला. गावात बाजार भरला होता. त्या बाजारात घोडा विकून त्याचे पैसे मिळवावे म्हणून घोड्याला घेऊन तो बाजारात उभा राहिला. गिऱ्हाईकं येत होती. घोडा बघून जात होती. कर्मधर्मसंयोगानं त्या घोड्याचा मालकच घोडा खरेदीसाठी तेथे आला. परंतु स्वत:चा घोडा ओळखला आहे हे त्याने अजिबात जाणवू दिले नाही. उलट त्यास घोड्याची किमत विचारून व्यवहार पक्का केला. आणि ”घोडा कसा आहे हे रपेट मारून बघतो आणि तुला पैसे देतो” असं म्हणत तो रपेट मारण्यासाठी निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो फिरकला नाही. चोराने खूप वाट पाहिली. शेवटी घरी परततांना आजूबाजूच्या व्यापार्यांनी ”घोड्याची किती किमत मिळाली ?” असे विचारल्यावर चोराने उत्तर दिले, ”जेवढ्याला घेतला तेवढ्यालाच दिला.”
तात्पर्य – करावे तसे भरावे.
एका गावात एक भुरटा चोर रहात होता . चोरी करणं हाच त्याचा व्यवसाय होता . गावात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्यानंतर तो आसपासच्या गावात जाऊन चोऱ्या करू लागला . अशाच एका गावात आला असताना एका मोठ्या घराच्या बाहेर तबेल्यात एक घोडा बांधलेला त्याला दिसला . त्या भुरट्या चोरासाठी ते गाव नवीन होते ; आणि अनोळखी असलेल्या या गावात आपल्याला कुणी ओळखणार नाही या समजुतीने त्याने तबेल्यात जाऊन त्या घोड्याचा दोर सोडून कुणाच्याही नकळत त्याला बाहेर आणले आणि रपेट मारत तो शेजारच्या गावात पोहोचला . गावात बाजार भरला होता . त्या बाजारात घोडा विकून त्याचे पैसे मिळवावे म्हणून घोड्याला घेऊन तो बाजारात उभा राहिला . गिऱ्हाईकं येत होती . घोडा बघून जात होती . कर्मधर्मसंयोगानं त्या घोड्याचा मालकच घोडा खरेदीसाठी तेथे आला . परंतु स्वत : चा घोडा ओळखला आहे हे त्याने अजिबात जाणवू दिले नाही . उलट त्यास घोड्याची किमत विचारून व्यवहार पक्का केला . आणि " घोडा कसा आहे हे रपेट मारून बघतो आणि तुला पैसे देतो ” असं म्हणत तो रपेट मारण्यासाठी निघून गेला . बराच वेळ झाला तरी तो फिरकला नाही . चोराने खूप वाट पाहिली . शेवटी घरी परततांना आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी " घोड्याची किती किमत मिळाली ? ” असे विचारल्यावर चोराने उत्तर दिले , " जेवढ्याला घेतला तेवढ्यालाच दिला . ” तात्पर्य – करावे तसे भरावे .