Karanji Ghat information in Marathi
Answers
म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील दोन धोकादायक वळणांवर सातत्याने होत असलेलया अपघातांमुळे या दोन्ही वळणांची रुंदी वाढवावी, अशी मागणी या महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून होत आहे.
कल्याण विशाखापट्टण या २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग झाल्याने कल्याण, मुंबई या ठिकाणाहून राज्यातील परभणी, बीड, नांदेड याशिवाय हैदराबाद, तसेच विशाखापट्टणमकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय झाली. या महामार्गालगत असलेल्या गावांमधील वर्दळही वाढली आहे. या महामार्गावर तालुक्यातील करंजी घाट येतो. या घाटात पूर्वी लुटमारीचे प्रकार घडत होते. मात्र, महामार्ग झाल्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, या घाटात असलेलया माणिकबाबा पीराजवळ असलेली दोन वळणे अत्यंत धोकादायक असलयाने या ठिकाणी अपघात हा घडतात. या वळणावर बांधकाम विभागाने संरक्षक कठडे व संरचक भिंती उभ्या केल्या असल्या तरीही अवजड वाहने येथून वळण घेताना कठड्यांना धडकतात. या प्रकारांमुळे अनेकवेळा या भिंती पडल्या आहेत. वळणाची रुंदी वाढवलयास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, ठोस उपोय करण्याऐवजी केवळ कठडे उभारून वेळ निभावून नेली जाते, असे वाहनधारक सांगतात. या वळणांवर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहनातील माल चोरीस जाण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर करंजी घाटातील दोन वळणांची रुंदी वाढवावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.