कथाकाराच्या 'पात्र' या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा.
Answers
कथा’ या वाङ्मय प्रकाराला दीर्घ परंपरा लाभली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. हा वाङ्मयप्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण यांची माहिती दिली आहे.
कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्ये विकसित होतात तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात. ‘कथा’ या साहित्यप्रकाराचा परिचय व्हावा, या हेतूने प्रस्तुत विवेचन केले आहे.
मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. ‘कथा’ या शब्दाचा शब्दश: अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांत पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण-गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे.
मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. ‘कथ्’ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. ‘कथ्’ या मूळ धातूपासून ‘कथा’ हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्यप्रकाराला फार मोठी परंपरा आहे