कथालेखन (80 ते 100 शब्द)
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. मुद्धेः एक तलाव बडबडे कासव दोन बगळे मैत्री तलाव आटणे दुस-या तलावता जाण्याचा विचार कासवाने उपाय - सुचवणे बगळ्यांनी काठीच्या मदतीने कासवाला घेऊन जाणे कासवाचे मध्येच बडबडणे उंचावरून खाली पडणे परिणाम. - -
Answers
Answer:
एका जंगलात एक मोठं तळं होतं. तळ्याचे पाणी सगळे प्राणी प्यायचे. तळ्याकाठी एक कासव व दोन बगळे राहायचे कासव आणि सगळे मित्र होते. पण कासव होतं भारी बडबड तर बगळे होते अगदी शांत. एकदा काय झालं पाऊस पडलाच नाही. आणि तळ आठवून गेलं. आता पाणी कुठून मिळणार? आता काय करावं? सगळ्यांनी विचार केला. त्यांनी दुसरं स्थळ शोधून काढलं. सगळेजण आवर निघाली. बगळे ही निघाले. पण कासव कसा जाणार. मी उडू शकत नाही मी कसा जाऊ कासवाची बडबड सुरू झाली. बगळ्याला एक युक्ती सुचली. त्याने एक काठी आणली. काठी पाहून कासव हसू लागले. बगळा कासवाला बजावून म्हणाला हे बघ कासवा तोंड उघडायचे नाही. आपण दुसऱ्या तळ्यात जाणार आहोत. कासवाला मजा वाटली. कासवाने काठी मध्ये पकडली. बगळ्यांनी काठी दोन टोकाला पकडली. बगळे कासवाला घेऊन उडू लागले. ते खूप खूप उंचावर गेले. निळा आकाश पाहून कासव खुश झालं. पण गप्प बसले ते कासव कुठलं? ते बोलायचं.किती सुंदर! कासवाच्या तोंडून काठी सुटली. कासव धपकन खाली पडलं. बडबड्या कासवाची दशा पाहून बगळ्यांनी कपाळावर हात मारला. मी उडू
तात्पर्य-जास्त बोलल्यामुळे आपलेच वाईट होते.