India Languages, asked by shreyadesai12, 20 days ago

कथालेखन : (80 ते 90 शब्द)
please it's important

Attachments:

Answers

Answered by goradesagar88
1

Explanation:

पूर्ण केलेली कथा .

रोझी मन लावून अभ्यास करत होती . सभोवती सगळा वह्या - पुस्तकांचा पसारा होता . अभ्यास करता - करता तिचे लक्ष तिच्या आवडत्या फिकट निळ्या रंगाच्या वहीकडे गेले . वहीच्या पानातून मोरपिसाचे टोक डोकावत होते . तिने हातातले अभ्यासाचे पुस्तक मिटवले आणि त्या मोरपिसाकडे एकटक बघत राहिली . जुन्या आठवणी ताज्या झाल्या . मागच्या वर्षी उन्हाळ्याची सुट्टीत आजोळी गेली होती . तिथला तो अचंबीत करताना निसर्ग आठवला . रोझीला त्या हिरवळ वातावरणात पिसारा फैलावून नाचणारा मोर आठवला . ती तिची मोर पाहण्याची प्रथमच वेळ होती . त्या मोरा मागे ती पूर्ण शेतभर धावली परंतु त्याला स्पर्श करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले . या सगळ्या गडबडीत काही मोरपंख मात्र जमिनीवर गळाले . ते मोरपंख तिने गोळा केले आणि घरी आल्यावर आठवण म्हणून मराठीच्या पुस्तकात दडपून ठेवले . अचानक आईचा आवाज आला , " काय ग काय झालं ? " आणि रोझी स्वप्नातून बाहेर येऊन पुन्हा अभ्यासाला लागली .

धन्यवाद ...

Similar questions